शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

१६ गुणांचा चुकीचा प्रश्न

By admin | Updated: November 27, 2015 02:58 IST

सुरुवातीला अगदी सुरळीतपणे सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विविध अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

‘एमकॉम’च्या पेपरमधील प्रकार : विद्यार्थी चिंतातूरनागपूर : सुरुवातीला अगदी सुरळीतपणे सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विविध अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या ‘एमकॉम’च्या पेपरमध्ये १६ गुणांचा चुकीचा प्रश्न आल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. काही महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ यावर काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या चौथ्या टप्प्यास २४ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यात प्रामुख्याने एमए, एमकॉम, बीए, बीएस्सी, बीकॉम अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ‘एमकॉम’ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘अ‍ॅडव्हान्स फायनान्शियल अकाऊन्टिंग’ विषयाचा पेपर घेण्यात आला. या पेपरमधील ‘पार्ट बी’मध्ये पाचवा प्रश्न हा संभ्रम निर्माण करणारा होता. यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आहे तसाच पेपर सोडविण्याचे निर्देश दिले. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विषयतज्ज्ञांशी संपर्क साधला. यात हा प्रश्न चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची कुठलीही अधिकृत तक्रार आली नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)काय आहे चूक?विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित प्रश्नात देण्यात आलेल्या रेकॉर्डमध्ये एकाच तारखेमध्ये दोनदा वेगवेगळ्या खरेदी रकमेचा समावेश करण्यात आला होता. प्रत्यक्षात ‘अकाऊन्टिंग’मध्ये असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. अनेकांनी उत्तरात दोन पैकी एक खरेदी रक्कम वापरून प्रश्न सोडविला.