शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांविरुद्ध चुकीची कारवाई, हायकोर्टाने व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.

ठळक मुद्देअवमानना कारवाई रद्द : सत्य माहिती लपविल्याचा होता ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.नागपूर खंडपीठातील एक सदस्यीय न्यायपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे अधिकारी, आरोग्य सेवक व वकील यांनी संगनमताने सत्य माहिती लपवून हवा तो दिलासा मिळवून घेतला, असा ठपका ठेवला होता व या प्रकरणात स्वत:हून अवमानना याचिका दाखल करून घेतली होती. नियमानुसार, ती याचिका न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. या द्विसदस्यीय न्यायपीठाने प्रकरणातील संपूर्ण रेकॉर्ड तपासल्यानंतर कुणीही चुकीचे वागले नसल्याचा निर्णय दिला व अवमानना कारवाई रद्द केली. या कारवाईमुळे विकलांचे झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. तसेच, त्यांच्या त्रासाचीही भरपाई करता येणार नाही. त्यामुळे आम्ही केवळ दिलगिरी व्यक्त करतो असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.या प्रकरणात सर्वजण आपापल्या ठिकाणी बरोबर होते. न्यायाधीश व वकील माणसेच असून प्रत्येक सुनावणीच्या वेळी काय झाले हे आठवेल एवढी प्रभावी स्मरणशक्ती त्यांना मिळालेली नाही. वकिलांनी न्यायालयासोबत बनवाबनवी केली हे रेकॉर्डवरून दिसून येत नाही. तसे असते तर, संबंधित सर्व याचिका एकाच वकिलामार्फत दाखल करण्यात आल्या असत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बदलल्यानंतर जिल्हा परिषदेची भूमिकाही बदलत असते. प्रकरणातील सर्व घोळ त्यामुळेच निर्माण झाला. त्यासाठी वकिलांना दोषी ठरवता येणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ते न्यायालयात वक्तव्ये करीत असतात असे मतही न्यायालयाने निर्णयात नोंदवले.करिअरचा विचार करणे आवश्यकवकिलांच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल अशी गंभीर निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी न्यायालयाने विशेष काळजी घेणे व सावधानी बाळगणे आवश्यक आहे. धोकादायक निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी संबंधित वकिलांना नोटीस द्यायला हवी होती. त्यानंतर, वकिलांनी संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयापुढे आणला असता. तो रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई करण्याची गरज भासली नसती, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, संबंधित न्यायपीठाने वकिलांचे नुकसान व्हावे या उद्देशातून अवमानना कारवाई सुरू केली नाही याचा विश्वास असल्याचेही निर्णयात स्पष्टपणे नमूद केले.

टॅग्स :advocateवकिलHigh Courtउच्च न्यायालय