शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या भरवशावर गल्लीत फिरण्यापेक्षा बौद्ध म्हणून जगात वावरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु सवलती जातील या भीतीमुळे आजही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु सवलती जातील या भीतीमुळे आजही अनेकजण धर्मासोबतच जातीचाही उल्लेख करतात. असे करू नका. जातीच्या भरवशावर गल्लीत वावरण्यापेक्षा बौद्ध म्हणून जगात वावरा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडक यांचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक राजरत्न अशोक आंबेडकर यांनी येथे केले.

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी कुकडे ले-आऊट येथील पवार सभागृहात ‌‘भारतीय बौद्धांची सद्य:स्थिती’ यावर मार्गदर्शन करताना ते बोलत हाेते. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक अनिल जवादे, सेंट पॉल महाविद्यालयाचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, अरुण गाडे, सुनील तायडे, डी.एस. तायडे, रवप पोथारे, संजय सायरे, संजय गोडघाटे, विलास गजभिये, सोनिया गजभिये, विनेश शेवाळे, शैलेश जांभुळकर, राजेश ढेेंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

राजरत्न आंबेडकर म्हणाले, सध्या देशात बौद्धांची संख्या ८० लाखांपेक्षा अधिक असूनही शासनदफ्तरी बौद्धांची आकडेवारी ०.६ टक्के एवढीच आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे अनुसूचित जातीच्या नावाने मिळणारे आरक्षण रद्द होऊ नये ही भीती होय. बौद्ध लोकांनी केवळ बौद्ध म्हणूनच नोंद केली तर ०.६ टक्के असलेली आकडेवारी ही ६.० टक्के इतकी होईल. त्यामुळे मनात भीती ठेवू नका. एप्रिल महिन्यापासून जनगणना सुरू होत आहे. तेव्हा धर्माच्या रकान्यात केवळ बौद्ध म्हणून उल्लेख करा. बौद्ध असा उल्लेख केल्यानंतर दुसरा कुठलाही उल्लेख करू नका, असे आवाहन त्यांनी केले.