शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी आचार्यश्री पुलकसागरजींचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

नागपूर : अखिल भारतीय पुलक मंच परिवारासोबतच अनेक भक्तांनी मंगळ‌वारी भारत गौरव राष्ट्रसंत शांतिदूत पुलकसागरजी गुरुदेव यांच्या ५१व्या अवतरण ...

नागपूर : अखिल भारतीय पुलक मंच परिवारासोबतच अनेक भक्तांनी मंगळ‌वारी भारत गौरव राष्ट्रसंत शांतिदूत पुलकसागरजी गुरुदेव यांच्या ५१व्या अवतरण दिनानिमित्त घरोघरी पूजनाचे आयोजन केले. यावेळी विधान, अष्टक, जयमाला, आरती, चालिसा, णमोकार महामंत्राच्या पाठाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच अनेक भक्तांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. काही कुटुंबांनी गीत, संगीताच्या माध्यमातून आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव यांना शुभेच्छा दिल्या. आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव श्री दिगंबर जैन जिनशरणं तीर्थधाम उपलाट, पालघर येथे विराजमान आहेत. गुरुदेवांच्या निर्देशामुळे नागपुरात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्षद्वय मनोज बंड व डॉ. रिचा जैन यांनी सांगितले.

गुरुदेव कृपाळू व दयाळू आहेत : दर्डा

सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव यांना शुभेच्छा संदेश पाठ‌विला. गुरुदेव आपण कृपाळू व दयाळू आहात. आपला वात्सल्यभाव आमच्यासारख्या भक्तांवर राहतो. २००५ साली नागपुरात आपला चतुर्मास झाला होता. चिटणीस पार्क स्टेडियममध्ये ४५ दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन झाले होते. प्रवचनानंतर लगेच प्रश्नमंच व्हायचा व त्याचे प्रायोजक होण्याचा बहुमान लोकमत समूहाला मिळाला होता. आचार्यश्री आम्ही दररोज ‘लोकमत’च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचविला होता. विस्कटलेल्यांना एका सूत्रात आणणे व बांधणे हा आपला मंत्र त्यावेळी सकल जैन समाजाला मिळाला होता. आमच्या सर्वांची प्रार्थना, अनेक आचार्य भगवंतांच्या मंत्रसाधनेतून व स्वत:च्या तपस्येतून गुरुदेवांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. नागपुरातील चतुर्मास अभूतपूर्व झाला होता व मला इतवारीत आचार्यश्रींचे दर्शन व आशीर्वादाचा लाभ झाला होता. मी अनेक विषयांवर आपल्याशी चर्चा केली व आपले मार्गदर्शनदेखील मिळाले. गुरुदेव म्हणतात की, पुस्तकं तुमची स्वत:ची मित्र असतात. गुरुंची गोष्ट सत्य आहे. आपल्या मार्गदर्शन, प्रेरणा व निर्देशनात बनलेल्या पुलक मंच परिवाराच्या शाखा देशभरात सक्रिय आहेत. तुमचे विचार, प्रकल्प समाजसेवेच्या माध्यमातून सर्व पुलकभक्त जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. मागील वर्षी कोरोनाकाळात नागपुरातच नाही तर मंचच्या सदस्यांनी देशभरात मदत पोहोचविली. मी आचार्य भगवंतांना अवतरण दिवसाच्या शुभेच्छा देतो. आचार्यश्री तुम्ही स्वस्थ राहा, दीर्घायू व्हा. आपला रत्नत्रय नेहमी मंगल होवो. कोरोनाची महामारी संपल्यानंतर नागपुरात आपला भव्य चतुर्मास व्हावा, अशी मी नागपूर आणि विदर्भातील आपल्या सर्व भक्तांतर्फे आपल्या चरणी प्रार्थना करतो. आम्हा सर्वांना आपले मार्गदर्शन व आशीर्वाद मिळावे. आपण नागपुरात यावे असे माझे आग्रहपूर्वक निवेदन आहे. आम्ही सगळे सकल जैन समाजाच्या झेंड्याअंतर्गत आपल्या आगमनाची प्रतीक्षा करू. परत एकदा गुरुदेव आपल्याला अवतरण दिवसाच्या शुभेच्छा. हे वर्ष आपल्यासाठी मंगलमय व्हावे, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.

शुभेच्छा संदेशातून गुरुंचे गुणगान

आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव यांच्या अवतरण दिवसानिमित्त देशभरातील भक्त, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन गुरुंचे गुणगान केले. आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई रसिकलाल धारिवाल, अखिल भारतीय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद फांदोत, मीना झांझरी, राष्ट्रीय महामंत्री प्रदीप जैन, बीना टोंग्या, सुमन गंगवाल, सोहनलाल कलावत, सीमा गंगवाल, अंकित जैन प्रिंस, सुनील काला, संतोष जैन पेंढारी, नरेश पाटनी, मनीष मेहता, मनोज बंड, डॉ. रिचा जैन, पंकज बोहरा, अतुल कोटेचा, पूनम बिनायका, दिलीप शिवणकर, नितीन नखाते, नीरज जैन, लोकेश पाटोदी, सतीश जैन पेंढारी, राजेंद्र नखाते, डॉ. रवींद्र भुसारी, कमल बज, पारस रांवका, ऋषभ आगरकर इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.