शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! २७१८ बाधित,४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST

काटोल/ कळमेश्वर/ उमरेड/ कुही/ रामटेक/ मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १३ ...

काटोल/ कळमेश्वर/ उमरेड/ कुही/ रामटेक/ मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला; तर २७१८ नवीन रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ९०,६४८ झाली आहे. गुरुवारी २४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्या आता ६१,५२० झाली आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८,०१० इतकी झाली आहे.

रामटेक तालुक्यात १३७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३६, तर ग्रामीण भागातील १०१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४६६५ झाली आहे. यातील २५२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१३४ झाली आहे.

कळमेश्वर तालुक्यात १८१ रुग्णांची भर पडली. यातील कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६, तर ग्रामीण भागात १५५ रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात १५५ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल शहरातील ४८, तर ग्रामीण भागातील १०७ रुग्णांचा समावेश आहे.

कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर ५९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात कुही येथील २०, मांढळ (१७), वेलतूर (२८), साळवा (७) तर तितूर येथे २५ रुग्णांची नोंद करण्यात आली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०४९ झाली आहे.

हिंगणा तालुक्यात १८४ रुग्ण

हिंगणा तालुक्यात गुरुवारी ११३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील मृत्युसंख्या १८७ झाली आहे. वानाडोंगरी येथे ७३, डिगडोह (१८), निलडोह (१५), रायपूर (१४), इसासनी (१२), कान्होलीबारा (११), मोंढा (८), टाकळघाट (४), सुकळी कलार, उमरी वाघ, खैरी व हिंगणा येथे प्रत्येकी ३, माथनी व मांडव घोराड येथे प्रत्येकी २, कवडस, अडेगाव, देवळी काळबांडे, डेगमा खुर्द, गिदमगड, सावंगी, देवळी, सुकळी घारापुरी, भारकस, आमगाव, किन्ही धानोली, बोरगाव व वडधामना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ९५५४ झाली आहे. यातील ५९०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.