शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:55 IST

महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात वाघांची संख्या वाढण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या १९० ते २०० असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्यापूर्वी २०१० मध्ये ही संख्या १७० च्या जवळपास होती. परंतु महाराष्ट्रात यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित वन क्षेत्रात झालेल्या वन्यजीव गणनेत वाघांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.वाघांची संख्या वाढण्यामागे वन्यजीव रक्षक त्यासाठी चार मोठी कारणे असल्याचे सांगत आहेत. राज्यात मागील १८ वर्षांतील प्रयत्नानंतर आतापर्यंत टायगर रिझर्व्ह आणि अभयारण्य क्षेत्राच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या ३० पेक्षा अधिक गावांचे वन्यजीवांचे अधिवास असलेल्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले. जवळपास ५,२०० कुटुंबांना वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. यासोबतच वर्ष २०११ पासून आठ वर्षात १२ नवे अभयारण्य घोषित करून संरक्षित वनक्षेत्रांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात जंगल क्षेत्राला लागून तीन हजार हेक्टर अतिरिक्त जमिनीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा वाघांच्या प्रजननासाठी अधिवास वाढला आहे.सरकारनेही शिकारीच्या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन संवेदनशील वन क्षेत्रात चांगल्या वन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटकमागील ४ ते ५ वर्षात महाराष्ट्रात वाघ आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यातील ५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून ते कारागृहात आहेत. वन्यजीव अवयवांच्या विक्रीत सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवरही वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोने नजर ठेवली. त्यामुळे या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले.

शासनाने दाखविली गंभीरता‘काही वर्षांपासून शासन वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर झाले आहे. आधी शिकार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सहज जमानत मिळत होती. त्यामुळे त्यांचे मनसुबे उंचावले होते. परंतु शासनाने त्यांची जमानत थांबविण्यासाठी गंभीर होऊन प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिकारीवर अंकुश लावण्यात यश मिळाले. यामुळे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’-किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :Tigerवाघ