शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक थॅलेसेमिया दिन : थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात दरवर्षी १२ हजार मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:00 IST

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत तीन ते चार टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ व्यक्तींमध्ये थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला थॅलेसेमिया मेजरचे १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे आहे. परंतु याबाबत फारशी जनजागृती नाही. महत्त्वाचे म्हणजे, शासकीय रुग्णालयात याबाबतची तपासणीच होत नाही, अशी खंत थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्देविंकी रुघवानी : देशात दोन लाख थॅलेसेमिया मेजर रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत तीन ते चार टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ व्यक्तींमध्ये थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला थॅलेसेमिया मेजरचे १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे आहे. परंतु याबाबत फारशी जनजागृती नाही. महत्त्वाचे म्हणजे, शासकीय रुग्णालयात याबाबतची तपासणीच होत नाही, अशी खंत थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी बोलून दाखविली. 

जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या पूर्वसंध्येवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रुघवानी म्हणाले, थॅलेसेमिया आनुवंशिक व्याधी आहे. थॅलेसेमियाचे तीन प्रकार आहेत. यात आजाराची व्यक्ती वाहक असते, ‘इंटरमिडीया’ असते व ‘मेजर’ (घातक) असते. दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य ‘थॅलेसेमिया मेजर’ पीडित असू शकते. या आजारात लहान मुलांमध्ये हिमोग्लोबीनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर होतो. यात प्रामुख्याने लोहची कमतरता असते. दुसरीकडे वारंवार रक्त दिल्याने लोहची मात्रा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. यामुळे हा आजार गंभीर होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या सुमारे तीन कोटीवर आहे. यात थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील सुमारे दोन लाख रुग्ण आहेत. या आजारातील रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असेल, तर प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, औषध व सोयी मिळणे आवश्यक आहेमेजर व्याधीचे स्वरूपअ‍ॅनेमियाचीच ही एक व्याधी आहे. या रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनची निर्मिती होत नाही. जन्मत:च अशी मुले सामान्यत: सारखीच असतात. वयाच्या ३ ते १८ व्या महिन्यात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. या मुलांची त्वचा पिवळट दिसते. मुले नीट खातपीत नाहीत. उलट्यांचे प्रमाण वाढते. परिणामी पुढील आठ वर्षांमध्ये रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. या रोगावर महागडा ‘अस्थिमज्जा प्रत्यारोपण’ (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) हा उपचार आहे. परंतु देशात मोजक्याच ठिकाणी हा उपचार होतो.औषधांची समस्या सुटली, चाचणी आवश्यकथॅलेसेमियाच्या रुग्णांना मेयो, मेडिकलसह आता डागा रुग्णालयातूनही औषध मिळत आहे. परंतु या शासकीय रुग्णालयांत थॅलेसेमियाची गर्भजल तपासणी होत नाही. खासगी केंद्रावर ही तपासणी महागडी आहे, यामुळे अनेक जण ती करीत नाही.नॅट टेस्टेड ब्लड आवश्यकथॅलेसेमियाच्या रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. शासकीय रक्तपेढीतून हे रक्त मोफत मिळत असले तरी ते होल ब्लड असते. यामुळे ‘एचआयव्ही’ व ‘हेपॅटायटिस’ सारख्या रोगाचा संक्रमणाची भीती असते, हे टाळण्यासाठी सरकारतर्फे थॅलेसिमियाच्या रुग्णांना ‘नॅट टेस्टेड ब्लड’ देण्यात यावे, अशी मागणी आहे.विवाहपूर्व थॅलेसीमियाची चाचणी करादोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत घातक थॅलेसीमिया पीडित होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींनी थॅलेसीमिया मायनरची रक्त चाचणी करावी, असे आवाहनही डॉ. रुघवानी यांनी केली.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर