शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !

By admin | Updated: August 7, 2014 01:02 IST

गीतरामायण हे केवळ रामाचे चरित्र नव्हे आणि केवळ काव्यही नव्हे. ते आपल्या संस्कृतीचे संचित आणि असामान्य शब्दांचे शिल्पच आहे. गदिमा अर्थात कवी माडगुळकर आणि त्यांच्या शब्दांना

रंगली गीतरामायणाची सुरेल मैफिल : लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड प्रतिष्ठानचे आयोजननागपूर : गीतरामायण हे केवळ रामाचे चरित्र नव्हे आणि केवळ काव्यही नव्हे. ते आपल्या संस्कृतीचे संचित आणि असामान्य शब्दांचे शिल्पच आहे. गदिमा अर्थात कवी माडगुळकर आणि त्यांच्या शब्दांना तितक्याच अथप्रवाहीत्वाने संगीताच्या माध्यमातून भाविक रसिकांपर्यंत पोहोचविणारे संगीतकार सुधीर फडके उपाख्य बाबुजी. या दोन्ही दिग्गजांनी गीतरामायण घराघरात पोहोचविले. रामायण हा ग्रंथ अजरामर आहेच पण रामायणातील प्रसंगावर आधारित गीतरामायण हा प्रत्येक मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा कितीही वेळा ऐकला तरी प्रत्येकवेळी त्याची मोहिनी वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला पडतेच. आज गीतरामायणाच्या सादरीकरणाने नागपूरकर श्रोते भक्तीरसात चिंब झाले. लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आज गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमत सखी मंचच्या सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी गीतरामायणाच्या श्रवणाचा आनंद घेतला. बाहेर पाऊस कोसळत होता पण गीतरामायण ऐकण्यासाठी श्रोते आवर्जून उपस्थित होते. अविनाश घोंगे, गुणवंत घटवई आणि वर्षा बारई या गायकांनी रामायणातील गीते सादर करून उपस्थितांची दाद घेतली. अनेक गीतांना वन्समोअर देत उपस्थितांनी आपल्या दर्जेदार अभिरुचीचा परिचयही यावेळी दिला. प्रभा देऊसकर यांचे नेटके निवेदन आणि गीताच्या आधी त्या गीतांचे प्रसंग त्या सांगत असल्याने रसिकांना प्रत्येक गीताची पार्श्वभूमी नेमकेपणाने कळत होती. त्यामुळे गीत ऐकताना रामायणातील अनेक प्रसंगांशी उपस्थित एकरूप झाले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ अविनाश घोंगे यांनी ‘कुश लव रामायण गाती’ या गीताने केला. गुणवंत घटवई यांनी ‘दशरथा घे हे पायसदान’ आणि वर्षा बारई यांनी सादर केलेले ‘राम जन्मला ग सखे...राम जन्मला, सावळा ग रामचंद्र’ या गीतांनी प्रभु रामचंद्रांच्या भक्तीत श्रोते तल्लीन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन कुसुमताई बोदड प्रतिष्ठानचे केशवराव बोदड, आरती बोदड, कल्पना भेंडे, गायक अविनाश घोंगे, गुणवंत घटवई आणि वर्षा बारई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी शशीकांत बोदड यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमात शिरीश भालेराव- व्हायोलिन, संदीप गुरमुळे - संवादिनी, मोरेश्वर दहासहस्र - तबला, चारुदत्त जिचकार - आॅक्टोपॅड आणि गोविंद गडीकर यांनी सिंथेसायझरवर साथसंगत केली. (प्रतिनिधी)