शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : जैविक खते आता बायो कॅप्सूलच्या रूपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:53 IST

दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संशोधनएक एकरासाठी एक बायो कॅप्सूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोममध्ये असलेल्या कृषी उद्योग विकास मंडळाच्या स्टॉलवर हे बायो कॅप्सूल शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे पिकांना जमिनीद्वारे मिळणारी मूलद्रव्ये मिळत नाही. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधुनिक नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित बायो कॅप्सूल आणले आहे.एका बायो कॅप्सूलमध्ये एक कोटी जीवाणू आहे. ते सर्व प्रकारच्या पिकांसाठी व फळांसाठी उपयुक्त आहे. यामुळे एक एकर शेतात एक बायो कॅप्सूल पुरेसे आहे. या कॅप्सूलमुळे जमिनीची पोत सुधारते, पिकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पादनाचा खर्च कमी होतो. जमिनीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढून पोत सुधारते. बायो कॅप्सूल वापरामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जैविक असल्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. मुळांची वाढ होऊ कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये योग्य प्रमाणात शोषली जातात.सहा कॅप्सूलची एक स्ट्रीप ३५० रुपयाला उपलब्ध आहे. कृषी उद्योग महामंडळाचे रुपेश दिगळे, भागवत सोमवन आणि जयश्री पाटील हे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर