शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक संगीत दिन; दिव्यांगांचे संगीतमय ‘दिव्यरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:37 IST

शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही. मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला.

ठळक मुद्देअभावग्रस्तांना मिळाला आत्मविश्वासाचा स्रोत

अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही ना. शिल्पा मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला. पुढे संगीत विषयात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली व एका खासगी शाळेत संगीत शिक्षक म्हणून रु जू झाल्या. मुलांना शिकविताना त्यांना जाणवले की अपंग आणि अंध लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. या शारीरिक कमतरता असलेल्यांना आत्मविश्वास देण्याचा निर्धार त्यांनी केला. कारण ही मानसिक अवस्था त्यांनीही भोगली होती. त्यांनी अनेक दिव्यांगांना एकत्रित करून ‘दिव्यरंग’ची स्थापना केली. हे दिव्यरंग त्यांच्यासारख्या अनेक मुलांसाठी आत्मविश्वासाचे स्रोत झाले आहे. सुरुवातीला कसे होईल, अशी धाकधूक होती, परंतु एकदा ही मुले मंचावर गेली आणि पुढे दिव्यत्वाचा हा प्रवास सुरू झाला. पुढे विजय देशपांडे, लक्ष्मी पांडे, जितेश ठाकरे, शशी परमार, संजय, सौरभ किल्लेदार आणि श्रेयस आदी कलावंत या ग्रुपमध्ये सामील झाले.दिव्यरंगने जेमतेम सुरु वात केली असून सध्या त्यांनी काही कार्यक्रम सादर केले आहेत. मात्र ही सुरुवात या अभावग्रस्तांना मानसिक बळ देणारीच आहे. आधी गाणे ठरवायचे, कुणा एकाकडे गोळा व्हायचे आणि जोमाने रियाज करायचा, असा त्यांचा नित्यक्रम. एकाच वेळी भेटणे शक्य नाही म्हणून जसे जमेल तसा रियाझ करायचा आणि उत्साहाने कार्यक्रम सादर करायचा. अशा अवस्थेतही ही भट्टी चांगली जमून आली आहे.या समूहातील दोन कलाकार अपंग नाहीत. त्यामुळे या सर्व प्रयत्नात त्यांची मदत मोलाची ठरत असल्याचे शिल्पा कोमलकर यांनी सांगितले. घरगुती भजनाच्या कार्यक्र मापासून ते स्टेजवरही या कलावंतांनी कार्यक्रम सादर केले आहेत. अवहेलना, उपेक्षा सहन करताना संगीताचा हा प्रवास या समूहातील कलावंतांसाठी नवी उमेद घेऊन आलाय.

टॅग्स :musicसंगीत