शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

नागपुरातील फुटाळ्यावर वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:00 IST

फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील.

ठळक मुद्देपर्यटक ऐकतील गुलजार यांचा आवाज, रेहमानचे संगीत फ्रान्सच्या क्रिस्टल ग्रुपचे ९४ फवारे लागणार

सैयद मोबीन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील. लाईट, साऊंड आणि मल्टीमीडिया शो लागणार असून हे स्थळ नागपूरचे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. हा प्रकल्प साकार होण्यासाठी जवळपास सव्वा वर्ष लागणार असून नागपूरकर २०२० पर्यंत या अनोख्या व्यवस्थेचा आनंद घेऊ शकतील.म्युझिकल फाऊंटनची विशेषता म्हणजे ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार पद्मश्री ए.आर. रेहमान यांचे संगीत आणि गीतकार पद्मश्री गुलजार यांचा आवाज. फाऊंटनच्या साऊंड डिझाईनची जबाबदारी ऑस्कर विजेता पद्मश्री रसेल पुकुट्टी यांना सोपविण्यात आली आहे. थिया (टीएचआयए) पुरस्कार विजेता गुईलोम डफलट यांना फाऊंटन डिझाईनची जबाबदारी देण्यात आली आहे. तांत्रिक संचालक म्हणजे एमी पुरस्कार विजेता वाय. अल्फोन्स रॉय आणि सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहिलेल्या आशा केलूनी या निर्मितीच्या क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून कार्य सांभाळणार आहेत. क्रिस्टल ग्रुपचे सीईओ मायकल अमान हे फाऊंटन प्रोडक्शन आणि इन्स्टॉलेशन करतील. यानुसार फुटाळा येथील वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटनच्या निर्मितीत विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग राहणार आहे.सध्या या प्रकल्पाच्या डिझायनिंग व तांत्रिक बाबींवर कार्य सुरू आहे. लाईट आणि साऊंड मल्टीमीडिया शोबाबत मार्गदर्शन आणि संबंधित प्रस्तावासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेत म्युझिकल फाऊंटनच्या तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून यामध्ये व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असल्याची माहिती आहे.

काम सुरू करण्यास लागला उशीरम्युझिकल फाऊंटन प्रकल्पाला नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मात्र पुढे हा प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) कडे सोपविण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत २६ मार्च २०१८ ला झालेल्या एनएमआरडीएच्या दुसऱ्या बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर लागत होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला.

अंबाझरीतही ‘मल्टिमीडिया शो’फुटाळा तलावाच्या धर्तीवर अंबाझरी तलावावरही मल्टिमीडिया शो सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पावरही काम सुरू आहे. हा शो स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित असेल. यामुळे अंबाझरी तलावाचे रूपही बदलणार असून नागपूर आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना या विहंगम दृश्याचा आनंद मिळेल व पर्यटकही आकर्षित होतील.

पाण्याच्या पडद्यावर नागपूरचा इतिहासफुटाळा तलावावर ४५ बाय १३ मीटरचे पाण्याचे दोन पडदे तयार करण्यात येणार असून त्यावर नागपूर शहराचा इतिहास दृष्टीस पडेल. फ्रान्सच्या क्रिस्टल ग्रुपतर्फे ९४ फवारे लावण्यात येणार असून सर्वात उंच फवारा ५० मीटरचा राहणार आहे. याशिवाय ३५ मीटरचे ६३ आणि २५ मीटर उंचीपर्यंत पोहचणारे १० फवारे लावण्यात येतील.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलाव