शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: February 20, 2017 02:19 IST

दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सव : चीनचे भदंत रेन दा यांच्या हस्ते २२ ला उद्घाटन नागपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात भारतीय लोकनृत्यासह चिनी गीत, संगीत व नृत्याची मेजवानी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) , बोशान झेंगझुऐ टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्किव्ह आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने हा आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी ऋतायुश, स्मारक समितीचे सदस्य विजय चिकाटे, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सुनील तलवारे, आणि धम्मचारी नागकेतू यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चीनमधील बोशान झेंगझुए टेंपल शांगडोनचे भदंत रेन दा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी बौद्ध विद्वान डॉ. यो (तायवान) , लेखक, निर्देशक व अभिनेते तिगमांशू धुलिया, धम्मचारी लोकमित्र, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदनंद फुलझेले, नॅशनल फिल्म आर्किव्हज आॅफ इंडियाचे प्रकाश मगदूम आणि आयकर विभागाचे सहआयुक्त अजय ढोके प्रमुख पाहुणे राहतील. यानंतर २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले तीन गुरू यांच्यावर रत्नमाला व्याख्यानमाला होईल. पहिल्या दिवशी संत कबीर यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत कंवल भारती, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्यावर सुशीला मरोले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यावर धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे मार्गदर्शन करतील. २४ ला महाकवि वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांचा कार्यक्रम होईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता समारोप होईल. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम हे प्रमुख अतिथी राहतील. याशिवाय २५ ला युवकांसाठी कार्यशाळा होईल. २६ ला बुद्धीला चालना देणारे कार्यक्रव तसेच धम्मचारी नागकेतू यांची ध्यान कार्यशाळा होईल. (प्रतिनिधी) फिल्म फेस्टिव्हल व चिनी कलावंतांचा संगीतमय कार्यक्रम या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिल्म फेस्टिव्हल व कला प्रदर्शन हे आहे. नॅशनल फिल्म आर्किव्हज आॅफ इंडियाद्वारा पुरस्कृत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वृत्तचित्र व फिल्म दाखविण्यात येतील. प्रसिद्ध लेखक, निर्देशक व अभिनेते तिगमांशू धुलिया यांच्या हस्ते या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. प्रख्यात चीन व भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. या कलावंतांशी संवादसुद्धा साधता येईल. तसेच चिनी कलावंतांचा अतिभव्य आंतरराष्ट्रीय चान टी म्युझिकल हा संगीयमय कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.