शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:12 IST

वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देमिलिंद औरंगाबादकरया रोगाबाबत गैरसमजच अधिक

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरीररातील सांधे, स्नायू यांच्यावर विविध कारणांनी येणारी सूज व त्यामुळे होणारा त्रास म्हणजे वातरोग (आर्थायटिस). वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली.१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक वातरोग दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. औरंगाबादकर म्हणाले, सगळ्यात जास्त आढळणारे वातरोग म्हणजे आमवात व संधिवात. अनुंवाशिक, व्हायरल इन्फेक्शन, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि हल्ली तरुण पिढीमध्ये असलेल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा रोग बहुतेक रोग्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. परंतु काही रुग्णांमध्ये याचे कारणही समजत नाही.

वातरोगाबाबत समज कमीचसामान्यांमध्ये वातरोगाबाबत समज कमी आणि गैरसमजच अधिक आहेत. यात मुख्य म्हणजे, हा रोग केवळ ज्येष्ठांनाच होतो, आई किंवा वडिलांना वात असेल तर मुलांनाही होतो, वात झाला म्हणजे सर्व संपले, कारण यावर काही औषधी नाहीत, आंबट खाल्ल्याने वात होतो, वात हा संसर्गजन्य रोग आहे, हा रोग झाल्याने मूलबाळ होत नाही, वातरोगामध्ये अ‍ॅलोपॅथीमध्ये केवळ वेदनाशामक औषधी व ‘स्टेरॉईड’च दिल्या जाते, युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणारा ‘गाऊट’ हा आजार मासिक पाळी नियमित सुरू असलेल्या स्त्रियांना होतो, असे अनेक गैरसमज आहेत. यामुळे काही रुग्ण योग्य उपचारापासून वंचित राहतात.- डॉ. मिलिंद औरंगाबादकरवातरोग लहान मुलांपासून वृद्धांना होऊ शकतोवातरोग हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही होऊ शकतो, असे सांगत डॉ. औरंगाबादकर म्हणाले, वातरोगामध्ये अनुवांशिकतेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे पालकांना झाला तर मुलांना होईलच असे नाही. विविध प्रकारच्या वातरोगांचे योग्य निदान झाल्यावर त्यावर अतिशय प्रभावी उपचारपद्धती ‘अ‍ॅलोपॅथी’मध्ये उपलब्ध आहे. वेदनाशामक व स्टेरॉईड ही वातरोगाची मुख्य औषधी नाहीत. वातरोग रुग्णांना मूलबाळ सामान्य होऊ शकते. केवळ सुरुवातीपासून काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. ‘गाऊट’ हा आजार रक्तातील युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होऊ शकतो. परंतु तो ४५ वर्षांखालील स्त्रियांमध्ये दुर्मिळ आहे. मांसाहार व मद्यपानाच्या व्यसनाने ‘गाऊट’ व्हायची शक्यता अधिक असते.

‘आमवात’वर प्रभावी उपचारडॉ. औरंगाबादकर म्हणाले, आपल्या विकृतींनी जीवन कष्टमय करणाऱ्या ‘आमवात’वर (आरए) अ‍ॅलोपॅथीमध्ये प्रभावी उपचार व औषधे उपलब्ध आहेत. या आजारात प्रामुख्याने छोटे सांधे दुखतात व त्यावर सूज येते. कधी कधी डोळे कोरडे होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, हाताला मुंग्या येतात आदी समस्याही दिसून येतात.

वयाच्या ४५ नंतर आढळणारा संधिवातसंधिवात हा वयाच्या ४५ वर्षांनंतर प्रामुख्याने आढळतो. लठ्ठपणा, अनुवांशिकता, व्यायामाचा अभाव, सांध्यांना आधी झालेली इजा आदी याची कारणे आहेत. संधिवात प्रामुख्याने गुडघे व जांघेच्या सांधा यांना होतो. यामध्ये सांध्यामधील हाडांवरच्या आवरणाची झिज होते व हाडांवर हाडे घासल्याने चालायला त्रास व दुखणे असते. नियमित व्यायाम, वजन कमी करणे, फिजिओथेरपी घेणे, औषधे याशिवाय सांध्यामध्ये इंजक्शन घेणे आदी उपचार आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य