शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ता अभिनेता घडवितो

By admin | Updated: October 9, 2015 02:56 IST

‘अभिनेता’ ही माझी ओळख नाही. मी रिपब्लिकन पँथर चळवळीतील कार्यकर्ता आहे आणि हीच माझी ओळख आहे.

सत्कार समारंभ : वीरा साथीदार यांचे प्रतिपादननागपूर : ‘अभिनेता’ ही माझी ओळख नाही. मी रिपब्लिकन पँथर चळवळीतील कार्यकर्ता आहे आणि हीच माझी ओळख आहे. अभिनेता त्यानंतर झालो. कार्यकर्ता हा अभिनेता घडवितो, मात्र कोणताही अभिनेता हा कार्यकर्ता घडवू शकत नाही, असे प्रतिपादन ‘आॅस्कर’ साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ या मराठी चिटपत्राचे अभिनेते वीरा साथीदार यांनी केले. स्वयंदीप परिवार, संस्थेतर्फे वीरा साथीदार यांचा गुरुवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून स्वयंदीप परिवार संस्थेचे प्रशांत ढाबरे, शामराव हाडके व भानुकुमार राऊत उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वीरा साथीदार यांचा सत्कार करण्यात आला. साथीदार पुढे म्हणाले, आजही मी जयभीमनगरात राहतो, आणि मला त्याचा अभिमान वाटतो. ‘कोर्ट’ चित्रपटाविषयी बोलतांना ते म्हणाले, या चित्रपटात गंभीर विषयासह काही विनोदी प्रसंग सुद्धा आहेत. त्यामुळेच तो जगात सर्वांत चर्चित चित्रपट राहिला असून, त्याला ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून नारायण कांबळे हे पात्र जगापुढे पोहोचले आहे. त्याची जगाला ओळख झाली आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाने मला ‘हिरो’ बनविले. मात्र मी आजही आंबेडकरी कार्यकर्ताच आहे. त्यामुळे आजही मी रस्त्याने फिरताना किंवा टपरीवर चहा पिताना दिसलो, की अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. परंतु आजही मी एक साधा कार्यकर्ता म्हणूनच जगतो आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन भानुकुमार राऊत यांनी केले.(प्रतिनिधी)