शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासासाठी एकत्रित काम करावे

By admin | Updated: January 25, 2017 02:49 IST

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन

जगदीश रामास्वामी : वायसीसीईतर्फे ‘इंडिया अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन नागपूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि.चे अध्यक्ष (कॉर्पोरेट बिझनेस एक्सेलन्स) जगदीश रामास्वामी यांनी येथे केले. मेघे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या (एमजीआय) वायसीसीई यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या(वायसीसीई)वतीने एक दिवसीय ‘इंडस्ट्री अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह-२०१७’चे आयोजन २१ जानेवारीला कॉलेजमध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एनवायएसएसचे सचिव सागर मेघे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप भट्ट, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या ग्लोबल वर्कफोर्स मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विप्रो टेक्नॉलॉजिसचे नॅशनल कॅम्पस मॅनेजर विश्वनाथन वेणकता सुब्रमणियम, ब्रेन अ‍ॅण्ड कंपनीचे भागीदार हर्षवर्धन, इन्क्युबेशन सेंटर आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. मिलिंद अत्रे, वेबोनाईस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा.लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष (एचआर अ‍ॅण्ड कल्चर) सच्चिदानंद कुळकर्णी, सीटीओ, केपीआयटी टेक्नॉलॉजीसचे सीटीओ वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. हेमंत पांडे आणि आयबीएम-इंडियाचे डिलेव्हरी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह डॉ. अ‍ॅन्जेला कुरियन उपस्थित होते. रामास्वामी म्हणाले, शासन, नागरिक, शिक्षण, उद्योग, सामाजिक स्वातंत्र्य देशाच्या विकासाचे पाच स्तंभ आहेत. या स्तंभांनी एकत्रित काम केल्यास देशाचा विकास होईल. परिषदेने उद्योग आणि शैक्षणिक समूहातील दरी दूर होईल. सागर मेघे म्हणाले, विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा आणि उद्योगांना तयार राहावे, यासाठी एमजीआयने पुढाकार घेतला आहे. वायसीसीईचे प्राचार्य आणि कॉन्क्लेव्हचे चेअरमन डॉ. यू.पी. वाघे यांनी वायसीसीईच्या १९८४ या स्थापना वर्षांपासूनची उपलब्धी सांगितली. एमजीआय प्लेसमेंटचे संचालक आणि कॉन्क्लेव्हचे सचिव प्रा. जावेद शेख यांनी आयोजनाची उद्दिष्टे सांगितली. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सत्रात जगदीश रामास्वामी, दिलीप भट्ट, डॉ. मिलिंद अत्रे, डॉ. के.एम. सुकीन्द्रन, हर्षवर्धन या वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ‘भारताच्या संक्रमण अर्थव्यवस्थेत युवकांना प्रशिक्षण’ या विषयावर डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विश्वनाथ वेणकता सुब्रमणियम, सच्चिदानंद कुळकर्णी, डॉ. हेमंत पांडे, डॉ. अ‍ॅन्जेला कुरियन यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. प्रा. जावेद शेख आणि डॉ. वैशाली रहाटे यांनी दोन्ही चर्चासत्राचे संचालन केले. डीबीएसीईआरचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. तत्त्ववादी, आरजीसीईआरचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. बापट, डीएमआयईटीआरचे प्राचार्य डॉ. एस.पी. उंटवाले, डीएमआयएमएसचे संचालक डॉ. शायनी चीब, एमजीआयचे संचालक (प्रशिक्षण) शांतनू खंडेश्वर, वायसीसीईचे रजिस्ट्रार डॉ. पी.के. डाखोळे आणि वायसीसीईच्या अकॅडमिक मॅटरचे डीन डॉ. एस.डी. भोळे उपस्थित होते.(वा.प्र.)