शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नगर पालिकांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:43 IST

राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा लाक्षणिक संप : एक दिवसाची सामूहिक रजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला. जिल्ह्यातील १३ नगर परिषद आणि ६ नगर पंचायतीच्या सर्वच कर्मचाºयांनी एका दिवसाची सामूहिक रजा घेतल्याने नगर परिषद व पंचायतीचे कामकाज ठप्प झाले. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाºयांनी पालिकेसमोर धरणे देत शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध केला. बुधवारी सामूहिक रजा आणि १० ते १४ आॅगस्टपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. त्यानंतरही शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय नगर परिषद मुख्याधिकारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उमरेड, रामटेक, काटोल, कामठी, मोवाड, सावनेर, खापा, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, मौदा, वानाडोंगरी, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, कन्हान, महादुला आदी नगर परिषद, नगर पंचायतमधील कर्मचाºयांनी बुधवारी या आंदोलनात सहभाग घेत लाक्षणिक संप पुकारला.हिंगणा नगर पंचायत तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजेवर गेल्याने दोन्ही कार्यालय बुधवारी दिवसभर बंद होते. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. या आंदोलनात हिंगणा नगरपंचायतचे गणेश पात्रे, अमोल घोडमारे, संजय माहुरे, चैतन्य डाहे तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे किरण रोगे, हरिश्चंद्र बारंगे, देवेंद्र शेंडे, देवीदास बेलेकर, उमेंद्र किन्हेकर, कुमुद सोनटक्के, लीलाधर डाखळे, सोनाली राऊत, सोनाली सोमनाथे आदी सहभागी झाले होते.वाडीत नगराध्यक्षांना निवेदनवाडी नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारून आपल्या प्रलंबित मागण्यासंदर्भात नगराध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले. यावेळी कर्मचाºयांनी मुख्याधिकारी राजेश भगत, भद्रावतीचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या उपस्थितीत पालिकेसमोर धरणे दिली. यावेळी उपमुख्याधिकारी आकाश सहारे, संघटन अध्यक्ष रमेश इखनकर, लेखा अधिकारी शरद करवाडे, प्रणाली दुधबळे, अभियंता प्रमोद माने, अश्वलेषा भगत, बी. पी. निकाजू, योगेश जहागीरदार, धनंजय गोतमारे, अविनाश चौधरी, कपील डाफे, लक्ष्मण ढोरे, रमेश इखनकर, कमलेश तिजारे , संदीप अढाऊ, भारत ढोके, रवींद्र रडके, एम. एम. वानखडे आदी उपस्थित होते. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कर्मचाºयांनी दिला.