शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

मानकापूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण

By admin | Updated: September 3, 2014 01:16 IST

अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मानकापूर उड्डाणपुलाचे काम अजून पूर्णच झालेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. असे असताना पूल बांधणार्या ओरिएंटल

नागरिकांना फटका : मनसेचा आंदोलनाचा इशारा नागपूर : अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मानकापूर उड्डाणपुलाचे काम अजून पूर्णच झालेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. असे असताना पूल बांधणार्या ओरिएंटल कंपनीने रेल्वेला ‘कम्पलिशन सिर्टिफकेट’ दिलेच कसे, असा सवाल मनसेचे उप शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला असून, हे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कंपनीला दिला आहे. मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्यांची सोय झाली असली तरी या परिसरात राहणार्या हजारो नागरिकांचे रोजचे जगणेच कठीण झाले आहे. शाळा, कॉलेज, मेडिकल, एटीएम, दवाखाना अशा सर्व सुविधा पुलाच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे झंिगाबाई टाकळीच्या बाजूने आहेत. त्यामुळे या बाजूच्या लोकांना रोज तीन किलोमीटरचा फेरा करून जावे लागत आहे. मुलांच्या शाळांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आॅटो आता या बाजूला यायला तयार नाहीत. किराणा दुकानातील माल येत नसल्याने दुकाने बंद पडत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर रेल्वेने जुने गेट बंद करून टाकले. त्यामुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी येथे दोनदा रेल्वे रोको आंदोलन केले.मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे प्रबंधक ओ.पी. सिंग यांना निवेदन देऊन रेल्वे फाटक पुन्हा सुरू करण्याची अथवा आरयूबी करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेने देशभरातील सर्वच फाटक बंद करायचा निर्णय घेतला असल्याने आता हे फाटक पुन्हा सुरू करता येणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी तोडगा निघत नसल्याने सोमवारी सकाळी परिसरातील शेकडो नागरिकांनी बंद असलेल्या रेल्वे गेटजवळ धरणे आंदोलन केले. प्रशांत पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांचे समर्थन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांशीही त्यांनी या संबंधात चर्चा केली. मटा शी बोलताना पवार म्हणाले की, पुलाच्या अलीकडून आणि पलीकडून ये-जा करण्यासाठी पुलाला पायऱ्या करण्यात येणार होत्या. या पायर्यांचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मग स्थानिक रिहवाशांची सोय न करताच पुलाचे काम करणार्या ओरिअएंटल कंपनीने रेल्वेला काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र कसे दिले, असा प्रश्न आहे.(प्रतिनिधी) रात्री पुलाखाली अंधार विद्यार्थिनी असुरक्षित या पुलाच्या बाजूला जे सर्व्हिस रोड आहेत तेथे अजून पथदिवे नाहीत. त्यामुळे फेरा मारून येतो म्हटले तरी ते सुरक्षित नाही. रात्री या पुलाखालील रस्त्यावर अंधार असतो. असमाजिक तत्त्वांनी या ठिकाणी आपला अड्डाच बनविला आहे. काही दिवसांपूर्वी येथून रात्री ट्यूशन क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनींना पकडण्याचा प्रयत्न असमाजिक तत्त्वांनी केला. त्यामुळे या परिसरातील पालक भयभीत झाले आहेत. याची दखल घेण्याची पवार यांनी सूचना केली. मंगळवारी ओरिएंटल कंपनीचे अधिकारी अपूर्ण कामाची पाहणी करणार असून त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या जातील, असेही पवार यांनी सांगितले.