शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या खापरी ‘आरओबी’चे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:28 IST

वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनऊ महिने संपले६० कोटींचा होणार खर्च, का रखडले काम?

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. हा पूल वर्षभरात पूर्ण होणार होता. पण नऊ महिने उलटूनही काहीच झाले नाही. आता कुठे कामाचा श्रीगणेशा होताना दिसत आहे.प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली असता, या प्रकल्पाचे बरेच काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी(एनएचएआय) हे काम मुदतीत पूर्ण होईल, असा दावा करीत आहेत.वर्धा मार्गावर जुना दोन लेनचा खापरी पूल अतिशय अरुंद आहे. या पुलावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेहमीच अपघात होतात. या समस्येचा निपटारा करण्यासाठी ‘एनएचएआय’च्या वतीने जुन्या खापरी पुलाला लागून नवा दोन लेनचा खापरी आरओबी तयार करण्यात येत आहे. १.१२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचा खर्च ६० कोटी रुपये आहे. या पुलाचे भूमिपूजन २५ जून २०१७ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.यावेळी गडकरींनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना हा पूल १२ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यातील नऊ महिन्यांचा कालावधी संपला आहे. परंतु आताही बहुतांश काम अपूर्ण असल्याचे दिसत आहे. पुलाचे ३२ पैकी २६ पिल्लर तयार झाले आहेत. सहा पिल्लरचे काम झालेले नाही. हे पिल्लर रेल्वेच्या परिसरात तयार करावयाचे आहेत. त्यासाठी रेल्वेकडून ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यापूर्वी रेल्वे संबंधित परिसरात होणाऱ्या कामाच्या डिझाईनला मंजुरी देईल. ही मंजुरीही आतापर्यंत मिळालेली नाही. पुलाचे ५४ पाईल (खड्डे) खोदून जवळपास १३ पाईप कॅप चढविण्यात आल्या आहेत. आरई वॉलचे कामही आताच सुरू झाले आहे. पिल्लर तयार झाल्यानंतर त्यावर गर्डर (सिमेंट स्लॅब) टाकण्याचे काम होईल. परंतु गर्डर कास्टिंगची सुरुवात आतापर्यंत झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे गडकरींनी दिलेल्या मुदतीत कामाचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचीही इतर प्रकल्पांसारखीच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार