शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाटकांची चळवळ वाढविण्यासाठीच कार्य करा

By admin | Updated: September 21, 2015 03:03 IST

एखादी संस्था निर्माण होते तेव्हा त्यात वादप्रवाद निर्माण होतात. पण हे वादप्रवाद संस्थेलाच धोका निर्माण करीत असतील तर विचार करायला हवा.

 ज्येष्ठ रंगकर्मी शफी नाईकवाडी यांचे आवाहन : नाट्य परिषदेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन नागपूर : एखादी संस्था निर्माण होते तेव्हा त्यात वादप्रवाद निर्माण होतात. पण हे वादप्रवाद संस्थेलाच धोका निर्माण करीत असतील तर विचार करायला हवा. नाट्यकलावंतांनी नागपुरात दुसरी शाखा निर्माण केली आहे. ही शाखा कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर नाट्यदेवतेची सेवा करण्यासाठी आहे. उत्तमोत्तम नाटकांचे सादरीकरण आणि नव्या दमदार प्रायोगिक नाटकांचे सादरीकरण करताना नाट्य चळवळीच्या वृद्धीसाठी प्रयत्न करा, असा सल्ला देत ज्येष्ठ रंगकर्मी शफी नाईकवाडी यांनी नागपूरच्या नाट्य परिषदेच्या नव्या शाखेचे उद्घाटन करीत सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचा ‘नाट्यसेवारंभ’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी विनोद कुळकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून अ़भा़ मराठीनाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप देवरणकर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर, परिषदेच्या नव्या शाखेच्या अध्यक्ष नलिनी बन्सोड, उपाध्यक्ष मिथून मित्रा व सरकार्यवाह पुजा पिंपळकर उपस्थित होते़ ज्येष्ठ दिग्दर्शक मदन गडकरी, महेश पातुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. नागपुरातील नाट्य परिषदेच्या नाराजीबाबत अप्रत्यक्षपणे नलिनी बन्सोड यांनी टीका केली. यासंदर्भात स्वत:च कोणत्याही बाबींवर भ्रम निर्माण करू नका आणि निराशेला बळी पडू नका, असे आवाहन नाईकवाडी यांनी केले. नव्या शाखेच्यावतीने रंगकर्मींसाठी पुरस्कार व नव्या नाट्य स्पर्धांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. रंगकर्मी व प्रकाशयोजनाकार सपनदादा मित्रा स्मृती ‘सपनरंग’ पुरस्कार व आशिष कांबळे स्मृती ‘रंगआशिष’ पुरस्कार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रंगकर्मी सलिम शेख यांनी केले़ प्रास्ताविक नलिनी बन्सोड यांनी केले. ऊर्मिला राऊत यांच्या नृत्य चमूने कथ्थक नृत्य सादर केले़ मल्हार गु्रपच्यावतीने नांदी सादर करण्यात आली़(प्रतिनिधी)जुन्या नाट्य परिषदेच्या कलावंतांची अनुपस्थिती एखाद्या महानगरात नाट्य परिषदेच्या दोन शाखा असणे नवे नाही. नागपूरचा पसारा वाढत असताना मध्यवर्तीने येथे दुसरी शाखा निर्माण करायला परवानगी दिली. त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. पण यानिमित्ताने जुनी आणि नवी शाखा यांच्यातील कार्यकारिणीत असणारा तणाव रंगकर्मींना जाणवला. जुन्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य या समारंभाला उपस्थित नव्हते.