शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कला क्षेत्रात परिश्रम करा

By admin | Updated: February 3, 2017 02:52 IST

अनेकजण अल्पावधीत आंतरराष्ट्रीय कलाकार बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कला क्षेत्रात ते शक्य नसते. कला क्षेत्र जेवढे सहज वाटते तसे ते नाही.

दीपक जोशी : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर : अनेकजण अल्पावधीत आंतरराष्ट्रीय कलाकार बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कला क्षेत्रात ते शक्य नसते. कला क्षेत्र जेवढे सहज वाटते तसे ते नाही. या क्षेत्रात जे कुणी मोठे झाले, त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. कठोर तपस्या केली आहे. त्यामुळे खोट्या प्रलोभनांना व भूलथापांना बळी पडू नका, आणि कठोर परिश्रम करा. असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे माजी विभाग प्रमुख दीपक जोशी यांनी केले. ‘आर्ट फ्लो’ या कला क्षेत्रातील तरुणांच्या ग्रुपतर्फे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित चित्र प्रदर्शनाचे गुरुवारी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून निशिकांत देशमुख, सदानंद चौधरी व समीर देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्ट फ्लो ग्रुपतर्फे मागील २० सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या ‘लँडस्केप’ स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यात पहिला पुरस्कार गोविंद परांडे यांनी पटकाविला तर व्दितीय पुरस्कार मारोती मानकर यांनी व तृतीय पुरस्कार सुमित ब्राह्मणकर यांनी मिळविला. याशिवाय विश्वनाथ तांबे, कुणाल दाभाडे, स्वप्निल शिरोडकर, सृष्टी लांजेवार व प्रियंका शिंगणे यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करण्यात आले. जोशी पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तोच नियम कला क्षेत्रासाठी सुद्धा लागू होतो. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन योगेश धनकासार यांनी केले तर दीपांकर उमरे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)