शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लाकूडविरहित अंत्यसंस्कार : नागपुरात लाकडाऐवजी घाटावर मिळणार गोवऱ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:28 IST

महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली.

ठळक मुद्देमनपाच्या घाटावर नवा नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली. विविध जळाऊ मिश्रणापासून तयार केलेल्या गोवऱ्या घाटावर नि:शुल्क मिळणार असून आता लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे.अंत्यविधीसाठी मनपाच्या काही घाटावर नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून दिली जातात. परंतु याचा खर्च मनपा प्रशासनाला परवडणारा नाही. शिवाय, पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण व्हायचा. दरम्यानच्या काळात विद्युतदाहिनी स्थापन करण्यात आली. मात्र अजूनही नागरिकांनी ही पद्धत फारशी स्वीकारली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जातो. एका शवदहनासठी साधारण ३०० ते ५०० किलो लाकडांचा वापर होतो. शव जाळल्यावर उरलेली रक्षाही पर्यावरणाला पूरक नाही. ही राख नदीचा प्रवाह प्रदूषित करत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यावर उपाययोजना व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गोवऱ्या पर्यायी सोय करण्यात आली आहे. या गोवऱ्या जळाऊ मिश्रणापासून बनविण्यात आल्या आहे. या गोवऱ्या म्हणजे सहा ते १२ इंचाचे गोळे आहेत. या गोवºया घाटावर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून हा नवा नियम सर्व घाटावर लागू करण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी बसपाचे उत्तम शेवडे यांनी त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांवर या गोवऱ्याच्या मदतीनेच अंत्यसंस्कार केले. याला अरुण साखरकर, शंकर थूल, विनोद सहकाटे यांनी सहकार्य केले. शेवडे यांचे म्हणणे आहे, मनपाने लाकडे वाचविण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. पर्यावरणासाठी लाकूडविरहीत अंत्यसंस्कार गरजेचे आहे. या गोवऱ्या जळाऊ साहित्यापासून केल्याने त्या लाकडासारख्याच जळतात.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका