शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड वाहतुकीचा गोलमाल!

By admin | Updated: May 7, 2014 14:04 IST

लाकडाची अवैध कटाई करून, त्याची वाहतूक करणे हा वन विभागातील नेहमीचा धंदा झाला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने काही खसरा ठेकेदार...

परवाना २३ नगांचा : वाहतूक मात्र ५३ नगांचीनागपूर : लाकडाची अवैध कटाई करून, त्याची वाहतूक करणे हा वन विभागातील नेहमीचा धंदा झाला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने काही खसरा ठेकेदार वर्षांनुवर्षांपासून हा गोरखधंदा करीत आले आहेत. वन विभागाने नुकतीच काही दिवसांपूर्वी अशाच एका लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकविरुद्ध कारवाई केली आहे. परंतु काहीच दिवसांत संबंधित वन अधिकाऱ्यांनी ट्रकमालकाशी हातमिळवणी करून, तो ट्रक परस्पर सोडून दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.या प्रकरणाची हकीकत अशी की, भंडारा येथील फिरत्या पथकाने काही दिवसांपूर्वी ट्रक क्रमांक एमएच ३१/डब्ल्यू / २८५६ याला लाकडाची अवैध वाहतूक करताना पकडले होते. या ट्रकची चौकशी केली असता, ट्रकचालकाकडे २३ लाकडाच्या नगाची वाहतूक करण्याचा परवाना होता. परंतु ट्रकमधील लाकडाची प्रत्यक्ष मोजणी केली असता, त्यात एकूण ५३ नग आढळून आले. यात जांभूळ झाडाचा एक नग, आजनाचे दोन नग व साजा लाकडाच्या ५0 नगांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सर्व मालावर संबंधित वन अधिकार्‍यांच्या हॅँमरचे निशाणसुद्धा होते. यामुळे फिरत्या पथकाने तो ट्रक संपूर्ण मालासह जप्ती करून, त्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. परंतु काहीच दिवसांत त्या ट्रकमधील माल गडेगाव येथील डेपोत खाली करून, तो ट्रक परस्पर सोडून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याची कुणी तरी वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांच्याकडे तक्रार केली. त्यावर पीसीसीएफ यांनी भंडारा येथील उप वनसंरक्षक विनय ठाकरे यांना अहवाल मागितला. मात्र गत चार महिन्यांपासून ठाकरे यांनी तो अहवाल दिला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यासंबंधी उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)