शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अंडरब्रीजसाठी महिला रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:45 IST

नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे

ठळक मुद्देरेल रोकोचा इशारा : आठ महिन्यांच्या विलंबामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे स्थानिक महिलांनी त्याचा विरोध करून हे काम त्वरित पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा तसेच रेल रोको करण्याचा इशारा दिला.सन २०१५ मध्ये मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या खाली आंदोलनकर्त्यांनी प्रदीर्घ उपोषण केले होते. या उपोषणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन रेल्वेच्या अधिकाºयांना खडसावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अंडरब्रीजच्या कामात आता फक्त रेल्वे ट्रॅकच्या घाडी गडर टाकण्याचे काम शिल्लक आहे. हे काम आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. आंदोलनकर्त्यांनुसार रेल्वे रुळाखाली गडर टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी बाकी आहे. त्यांच्या मते कुठे, कोणत्या स्तरावरील काम थांबले आहे हे पाहणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. काम सुरू केल्यानंतर ते मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. हे काम २० नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. ते २०१६ मध्ये पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु काम कासवगतीने सुरु असल्यामुळे २०१७ पर्यंत ते पूर्ण झाले नाही. आंदोलनादरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्ता शंभु सिंह, साकिब खान, पांडुरंग ठाकरे यांच्यासह किरण बावला, नीलम, आशा भागरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अपंगांसाठी कठीणतिरुपतीनगर येथील रहिवासी ज्योती महाजन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अपंग आहे. त्याला शाळेत व ट्यूशनला जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे त्याला आणि इतर महिलांना मोठा त्रास होत आहे.एटीएमकडे जाण्यासाठी त्रासकल्पना बैस, मीरा चुरागळे आणि रमावती सिंह यांनी सांगितले की, रेल्वे अंडरब्रीज तयार करण्यात जी उदासीनता दाखविण्यात येत आहे. त्यामुळे झिंगाबाई टाकळीत एटीएममधून पैसे काढण्यासाठी रुळ ओलांडावा लागत आहे. लांब फेरा घालण्यामुळे वाहनातील पेट्रोल खर्च होत आहे. सर्व्हिस रोडवरून पुलापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक धोका राहतो आणि वेळही खूप लागतो. अशा स्थितीत मुलांमुळे अधिक चिंता वाटते.या भागातील नागरिकांना आहे त्रास४रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे ओमनगर, ओम साई नगर, आर्य नगर, तिरुपति नगर कॉलनी, शंभू नगर, गायत्री नगर, बाबा फरीदनगर, नारा रोडकडील नागरिक त्रस्त आहेत.