शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने दाबला महिला वकिलाचा गळा

By admin | Updated: July 21, 2015 03:02 IST

आपल्या गैरअर्जदार पतीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकील महिलेचा एका महिलेने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न

न्यायालय कॅन्टीनमधील घटना ठार मारण्याचा होता प्रयत्न घटनेचा डीबीएकडून निषेधनागपूर : आपल्या गैरअर्जदार पतीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकील महिलेचा एका महिलेने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त मारहाण केली. ही घटना सोमवारी १.३० वाजताच्या सुमारास न्यायमंदिर इमारतीतील अन्नपूर्णा कॅन्टीनमध्ये घडली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल आणि माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. अ‍ॅड. सुंदरी चक्रनारायण, असे वकील महिलेचे नाव आहे. त्यांनी सदर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव अश्विनी राहुल पिणे असे असून, ती पांढराबोडी येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्या जखमी अ‍ॅड. चक्रनारायण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, अश्विनी हिने चार महिन्यापूर्वी आपल्या पतीविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले आहे. त्यावेळी तिने कौटुंबिक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केलेला आहे. या दोन्ही प्रकरणात या महिलेचे वकील अ‍ॅड. नरेश राऊत हे आहेत तर गैरअर्जदार पतीचे वकील अ‍ॅड. सुंदरी चक्रनारायण आणि अ‍ॅड. अजय मदने हे आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या खटल्याचे कामकाज सुयोग इमारतीमधील न्यायालयात चालते. १७ जुलै रोजी याप्रकरणी न्यायालयात तारीख होती. त्यामुळे अ‍ॅड. चक्रनारायण या अर्जकर्त्या अश्विनीचा पती राहुल पिणे याचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्तीसोबत असलेल्या अश्विनीने चक्रनारायणच्या अंगावर चालून जाऊन शिवीगाळ केली होती.