शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना सन्मान मिळावा

By admin | Updated: October 3, 2015 03:16 IST

इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मायावती असो वा सुषमा स्वराज. त्यांंनी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य केले.

 नितीन गडकरी : ‘बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती’ रॅलीला प्रतिसादनागपूर : इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मायावती असो वा सुषमा स्वराज. त्यांंनी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य केले. आज सर्वच क्षेत्रात महिलांचे कार्य प्रशंसनीय आहे. पण समाज सन्मान देत नाही. महिलांना बरोबरीचा सन्मान मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. भाजपने देशभरात बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यानिमित्ताने नागपुरात भाजपच्या महिला मोर्चातर्फे व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅली आयोजित करण्यात आली.महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृ ष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेश महासचिव राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉ. कीर्तिदा अजमेरा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, रमेश मानकर, महिला मोर्चाच्या ग्रामीण अध्यक्ष सरोजनी तांदूळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महिलांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे हा विचार समाजात रुजला पाहिजे. यासाठी जनजागृतीची गरज असल्याने भाजपने देशभरात बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. समाजात जागृती येत असून समाजकारण योग्य दिशेने जात आहे. मुलींचा जन्मदर कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नवरात्रोत्सवात कन्या पूजननवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. तसेच या नवरात्रोत्सवात गावागावात कन्या पूजन करा, असे आवाहन सरोज पांडे यांनी केले. मुलींची संख्या कमी होत आहे. यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. इतर देशात महिलांचा सन्मान होत नाही परंतु आपल्या देशात अशी परिस्थिती नाही. महिलांचा सन्मान व्हावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाची घोषणा केल्याची माहिती त्यांनी दिली.महिलांची गर्दीबेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यात महाल येथील राजेन्द्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंगणा येथील रेणुका नर्सिंग कॉलेज, बाभुळखेडा येथील रावसाहेब ठवरे विद्यालय, कामठी मार्गावरील युगांतर महिला विद्यालय, सदर येथील युगांतर हायस्कूल आदी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात सहभाग होता.बेटी बचावच्या घोषणा देत रॅलीबेटी बचाव-बेटी पढाव अशा घोषणा देत व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच विद्यार्थिनींचे लेझीम पथक, दुर्गा देवीचा वेश परिधान केलेली युवती, घोड्यावर बसलेली राणी लक्ष्मीबाई आदींचाही रॅलीत सहभाग होता.