शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजिका मेळाव्यातून महिलांना बळ ! नागपूरसह विदर्भातील महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:47 IST

महिला उद्योजिकांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी मिळावी, पाक कौशल्याला चालना मिळावी, महिला गृहउद्योग व हस्तकौशल्य उद्योगांचा विकास व्हावा, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे, अशा हेतूने महापालिका, महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभाग यांच्यावतीने रेशीमबाग मैदानवर महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरसिक प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महिला उद्योजिकांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी मिळावी, पाक कौशल्याला चालना मिळावी, महिला गृहउद्योग व हस्तकौशल्य उद्योगांचा विकास व्हावा, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे, अशा हेतूने महापालिका, महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभाग यांच्यावतीने रेशीमबाग मैदानवर महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून महिला उद्योजिकांना नवे बळ मिळाले आहे. सोबतच रसिक प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.मेळाव्यात महिला उद्योजिकांना ३०० उपलब्ध करण्यात आले आहे. यात महिलांनी बनविलेले पेंटिंग, कलाकुसरीच्या वस्तू, मातीची आर्क षक भांडी, बाहुल्या, घरगुती वापराच्या वस्तू, विविध  प्रकारचे  खाद्यपदार्थ, कपडे, नैसर्गिक शेतातील भाजीपाला व धान्यापासून बनविण्यात आलेल्या पदार्थांच्या स्टॉलचा समावेश आहे. महिला उद्योजिकांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आज रविवारी सायंकाळी  मेळाव्याचा समारोप होत आहे.श्रीकृपा गृहउद्योगाची भरारीअमरावती शहरातील महिलांनी एकत्र येऊन दोन वर्षापूर्वी श्रीकृपा गृह उद्योगाला सुरुवात केली. महिलांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीला सुरुवात केली. खमंग ढोकळा, लोणची, पापड, इडली अशा पदार्थांना लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. काही महिन्यातच गृहउद्योगाचा खमंग ढोकळा स्वादिष्ट असल्याने लोकप्रिय झाला. बघताबघता श्रीकृपा गृहउद्योगाने भरारी घेतल्याची माहिती या बचत गटाच्या स्मिता संजय घाटोळ यांनी दिली. या बचत गटात १० महिलांचा समावेश असून सर्वांना रोजगार मिळाला आहे. मेळाव्यातही खमंग ढोकळ्याला चागंला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती घाटोळ यांनी दिली.बचत गटामुळे रोजगार मिळालावर्धा जिल्ह्यातील सेलू येथील कुमकुम स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बळ मिळाले. बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, लोणची, पापड, अंबाडी शरबत असे विविध पदार्थ विकण्याला मेळाव्याच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी हा महिला बचत गट स्थापन करण्यात आला. यातून महिलांना रोजगार मिळाल्याची माहिती रिता गणेश पोहाणे यांनी दिली. महिलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना चांगली किंमत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.पेंटिंगमधून साकारले ग्रामीण जीवनदुर्गम भागातील आदिवासी तसेच ग्रामीण भागातील जीवनावर आधारित पेंटिंगच्या माध्यमातून रुढी व परंपरांची माहिती देण्याचा छंद गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील योगिता दिनेशकुमार मौजे या महिलेने जोपासला आहे. शिल्पी सखी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या स्टॉलमध्ये त्यांनी बनविलेले आकर्षक पेंटिंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. बारावीनंतर प्रशिक्षण घेऊ न त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील सोदलागोंदी येथील नागझिरा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोहाफूल व हळद, कारली, लसूण व कांदा यापासून लोणची बनविलेली आहेत. यातून महिलांना रोजगार मिळाल्याची माहिती उषा महेंद्र पिसदे यांनी दिली. दोन्ही स्टॉल एकत्रच लावण्यात आले आहेत.बोलक्या बाहुल्यांनी संसार बहरलावर्धा येथील बारापात्रे कुटुंबीयांचा बाहुल्या बनविण्याचा पिढीजात व्यवसाय. कोकिळा जगदीश बारापात्रे यांना लहानपणापासून बाहुल्या बनविण्याचा छंद आहे. छंदासोबतच त्यांना यातून रोजगार मिळाला आहे. आकर्षक व बोलक्या बाहुल्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. चेहºयावर विविध प्रकारचे हावभाव असलेल्या बाहुल्या बनविणे ही एक कला आहे. आकर्षक बाहुल्यांना चांगली मागणी आहे. मेळाव्यातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकिळा बारापात्रे यांनी दिली. यातून रोजगार मिळाल्याने बोलक्या बाहुल्यांनी बारापात्रे यांचा संसार बहरला आहे.‘सुयोग’च्या स्वेटरला प्रतिसादगेल्या २० ते २५ वर्षापासून स्वेटर बनविण्याचा व्यवसाय गणेशनगर येथील भाग्यश्री पोहरे करतात. त्यांनी सुयोग वूलन वेअर सुरू केले आहे. सोबतच टिकल्या, लहान मुलांचे कपडे बनवितात. बेबी सेट्स, शॉल, टेबल मॅट, सॉक्स, बुटी, स्कार्फ व टोपी अशा प्रकारचे कपडे व वस्तू त्या बनवितात. यातून रोजगाराचे साधन मिळाले आहे. महिला उद्योजिका मेळाव्यात त्यांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलांच्या कपड्यांना अधिक मागणी असल्याची माहिती भाग्यश्री पोहरे यांनी दिली.‘उमेद’मुळे मिळाले बळवर्धा येथील उमेद पूर्ण स्वयंसाहाय्यता समूह गटाच्या माध्यमातून आशा देवळीकर यांना रोजगार मिळाल्याने बळ मिळाले आहे. गेल्या पाच वर्षापासून खाद्य पदार्थ बनविण्याचे काम करतात. कुरड्या, पापड, वळ्या, सरगुंडे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले जातात. ग्राहकांची चांगली मागणी असल्याची माहिती आशा देवळीकर यांनी दिली. स्वयंरोजगारासाठी शासन अनुदान मिळाल्याने या व्यवसायात प्रोत्साहन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.मातीच्या भांडीमुळे जीवनाला आधारनंदनवन भागातील जगनाडे चौक नजिक राहणाऱ्या  व पिढीजात कुंभारकाम करणाºया कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन गेल्या पाच वर्षापूर्वी शितला माता महिला बचत गट स्थापन केला. विविध प्रकारची मातीच्या भांडी तयार केली जातात. लोकांची मागणीही आहे. यातून रोजगार मिळाला आहे. व्यवसाय वाढावा यासाठी र्बॅकेकडे कर्जासाठी अर्ज केला परंतु कर्ज मिळाले नाही. अशी माहिती बचत गटाच्या चंद्रकला गंगाधर चिकाणे यांनी दिली. बचत गटात चिकाणे यांच्यासोबत मंदा ठाकरे, सुनीता पिल्लेवार व अन्य महिलांचा समावेश आहे.सेंद्रीय तांंदूळ व धान्याला मागणीभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील कृषी समृद्धी महिला बचत गटाने सेंद्रीय शेतीतून उत्पादीत धान्य व भाजीपाला विक्री तसेच यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मेळाव्यात सेंद्रीय तांदूळ हातोहात विकला गेला. टमाटे, लसून, बटाटे यापासून बनविलेले पापड, शेवया, कुरड्यांना चांगली मागणी असल्याची माहिती करिष्मा उईके यांनी दिली. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कमी होत असल्याने धान्याची किंमत काही प्रमाणात अधिक आहे. परंतु आरोग्याचा विचार करता सेंद्रीय शेतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.अपंग दाम्पत्याच्या मुलींची परिस्थितीवर मातपरिश्रम केले तर यश मिळणारच, असा ठाम विश्वास व वडिलांचे पाठबळ यातून प्रेरणा व कनिका पशुपती भट्टराई या दोन बहिणींनी परिस्थितीवर मात के ली आहे. नारा- नारी भागातील पॉवरग्रीड चौकातील रहिवासी असलेली प्रेरणा ही एमबीए तर कनिका बारावीत शिकत असतानाही त्यांनी खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मेळाव्यातील त्यांच्या अपंग महिला उद्ममी या २५८ क्रमाकांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे वडील पशुपती व आई कविता भट्टराई हे दोघेही अपंग आहेत. पशुपती अपंग असूनही बॅग व पर्स तसेच अन्य वस्तू बनविण्याचा व्यवसाय करतात.यात कविताचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे या स्टॉलवर ग्राहकांना बिल देण्यासाठी पेटीएमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.जयश्रीराम बचतगटाची भरारीचंदननगर येथील जयश्रीराम महिला बचतगट व सहकार्य महिला बचतगटातील महिलांनी एकत्र येऊन गेल्या सात वर्षापासून खाद्यपदार्थ व पाक कौशल्यातून आपली ओळख निर्माण केली आहे. बचतगटाच्या पापड, शेवया, कुरड्या, लोणची अशा पदार्थांना चांगली मागणी आहे. तसेच पावभाजी, पकोडे, भजी व अन्य खाद्यपदार्थाना मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मीना अनिल कोहाड व ज्योती हुकरे यांनी दिली. बचतगटामुळे रोजगार मिळाला आहे. यातून काही पैशाची बचत होत असल्याची माहिती त्यांनी दिली.बचतगटामुळे संसाराला हातभारनागपूर शहरातील मिरची बाजार येथील श्रीकृपा महिला बचतगटाच्या महिलांनी एकत्र येऊन कपडे व खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षापासून त्या हा व्यवसाय करीत असल्याने संसाराला आर्थिक हातभार लागल्याची प्रतिक्रिया माया कल्याणकर व कुंजलता गौर यांनी दिली. मेळाव्यातही ग्राहकांचा प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले.पाककृती कार्यशाळामहिला उद्योजिका मेळाव्याच्या चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जयम त्रिवेदी यांनी विना अंड्याचा केक, सँडविच, समोसे आदींच्या पाककृती सादर केल्या.ई- रिक्षा वर कार्यशाळामहिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी खास दिव्यांगांसाठी ई-रिक्षाचे प्रात्याक्षिक राजेश स्टील आणि एस.एस.इंटरप्राईजेसच्यावतीने दाखविण्यात आला. यावेळी ५८ दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकWomenमहिला