शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:48 PM

महिलांनी विविध क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी वा उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला. जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात त्या होत्या.

ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार : नागपूर मनपात महिला दिनाला विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनी विविध क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी वा उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला. जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात त्या होत्या.या प्रसंगी विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय सेवाप्रमुख आणि वाघमारे मसाले उत्पादनाच्या संचालिका मृणालिनी वाघमारे, डॉ. प्रतिभा अश्विन मुदगल, महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, माजी सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती विशाखा मोहोड, दिव्या धुरडे, मनिषा अतकरे, खान नसीम बानो मो. इब्राहीम, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपअभियंता कल्पना मेश्राम, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर व आरोग्य अधिकारी सविता मेश्राम आदी उपस्थित होत्या.मृणालिनी वाघमारे यांनी महिलांनी गृहस्थाश्रमाची जबाबदारी योग्यपणे पार पाडतानाच उद्योग क्षेत्रात कशी भरारी घेतली, याबाबत विवेचन केले. डॉ. प्रतिभा मुदगल यांनी महिला दिनाचे वास्तव परखडपणे मांडतानाच स्त्रियांसाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो, असे सांगितले. प्रगती पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. वर्षा ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले..कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. उपअभियंता कल्पना मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कर्तृत्ववान महिलांचा सत्कारसत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, शिक्षिका उषा मिश्रा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर,स्वरांजली वस्तीस्तर संस्थेच्या सुषमा भोवते, लेखिका आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्ष रश्मी पदवाड-मदनकर, नवलाई शहरस्तर संस्थेच्या बेबीताई रामटेके, भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये, आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ठसा उमटविणाºया वंदना व्यास, जलतरणपटू हिमानी फडके आदींचा महापौरांच्या च्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.आरोग्य शिबिर आणि स्वच्छता मोहीममहापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमानंतर परिसरात महिलांद्वारे स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.

 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका