शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मंगळवारी सकाळी छत्रपती चाैकाजवळच्या फूटपाथवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने उलटसुलट चर्चेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मंगळवारी सकाळी छत्रपती चाैकाजवळच्या फूटपाथवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. शवविच्छेदन तपासणीनंतर महिलेचा मृत्यू शारीरिक व्याधीमुळे झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.

मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास वर्धा मार्गावरील छत्रपती चाैकाजवळच्या प्रिन्स कॉम्प्लेक्सजवळ डिव्हायडरवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह (वय अंदाजे ४० ते ४५) आढळला. तिचे कपडे अस्तव्यस्त होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार दिनकर ठोसरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी आजूबाजूला विचारणा केली असता सदर महिला तीन चार महिन्यांपासून या भागात भीक मागत असल्याचे उघड झाले. तिच्यासोबत आणखी एक भिकारी राहत होता, असेही पोलिसांना कळले. तत्पूर्वी ती काशीनगर अजनीत राहत होती, हे माहीत झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांबाबत चाैकशी केली. तिचा मुलगा अमरावतीला राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला. दरम्यान, महिलेचे विस्कटलेले कपडे आणि तिच्या सोबत राहणारा भिकारी बेपत्ता असल्याने पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला. रात्री डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात महिलेचे फुफ्फुस खराब झाले होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शंकाकुशंकांना विराम मिळाला. एएसआय वसंत शेडमाके यांनी रवींद्र जनार्दन गाऊत्रे (वय ३२) यांची तक्रार नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

महिलेने जाळून घेतले

नागपूर - हमीदनगर, यशोधरानगरात राहणाऱ्या यासिन बानो जाकिर शेख (वय २२) यांनी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जाळून घेतले. मिळालेल्या माहितीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----