शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडित महिलेला गर्भपाताची अनुमती नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातील पीडित महिलेला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची अनुमती देण्यास नकार दिला. गर्भपात केल्यास आई व बाळ या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो ही बाब सदर निर्णय देताना लक्षात घेण्यात आली. न्यायमूर्तीद्वय शंतनू केमकर व नितीन सांबरे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : आई व बाळाच्या जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातील पीडित महिलेला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची अनुमती देण्यास नकार दिला. गर्भपात केल्यास आई व बाळ या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो ही बाब सदर निर्णय देताना लक्षात घेण्यात आली. न्यायमूर्तीद्वय शंतनू केमकर व नितीन सांबरे यांनी हा निर्णय दिला.न्यायालयाने गर्भपातावर अहवाल देण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आणि मंडळामध्ये मेयोचे अधिष्ठाता, बालरोग विभाग प्रमुख, प्रसुती विभाग प्रमुख व रेडिओलॉजी विभाग प्रमुख यांचा समावेश करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने वैद्यकीय मंडळ स्थापन केले. मंडळाने पीडित महिलेची तपासणी करून न्यायालयात अहवाल सादर केला. महिलेच्या पोटातील गर्भ ३० ते ३१ आठवड्यांचा असून त्याची पूर्ण वाढ झाली आहे. गर्भ सुदृढ अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत गर्भपात केल्यास आई व बाळ या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो, असे मंडळाने अहवालात स्पष्ट केले. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता महिलेला दिलासा देण्यास नकार देऊन तिची रिट याचिका फेटाळून लावली. हा निर्णय देताना बलात्कार प्रकरणाशी संबंधित अन्य सर्व मुद्दे मोकळे ठेवण्यात आले.पीडित महिला व्यवसायाने घर कामगार असून मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झाल्याचे तिचे म्हणणे आहे. ती आधीच दोन मुलांची आई आहे. कायद्यानुसार, २० आठवड्यांवरील गर्भ पाडता येत नाही. डॉक्टर्सनी गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीडित महिलेतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी व अ‍ॅड. सागर आशिरगडे तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.तर बाळावर अन्याय होईलपीडित महिलेची विनंती मान्य केल्यास तिच्या पोटातील पूर्ण वाढ झालेल्या बाळावर अन्याय होईल, असे मौखिक मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. गर्भपात करायचा होता तर, महिलेने सुरुवातीच्या दिवसातच रुग्णालयात जायला हवे होते. परंतु, तिने तसे केले नाही. ती गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत थांबली. न्यायालयात येण्यास तिला बराच विलंब झालाय असेही निर्णयात नमूद करण्यात आले.असे आहे प्रकरणपीडित महिलेप्रमाणे आरोपीदेखील दोन अपत्यांचा बाप आहे. पीडित महिला त्याच्या घरात काम करीत होती. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी आरोपीने महिलेला कार्यालयाची साफसफाई करण्यास सांगितले. दरम्यान, त्याने महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे महिलेने काम सोडून दिले. दोन दिवसांनंतर आरोपीचा मुलगा व सून महिलेला समजावण्यासाठी गेले व त्यांनी महिलेला कामावर परत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेवर बलात्कार केला व त्याची वाच्यता केल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. घटनेच्या दोन महिन्यांनंतर महिलेने धाडस करून आरोपीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. परंतु, त्यांनी महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही व तिला जबर मारहाण केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार