शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ४० हजार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 10:59 IST

डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने एका व्यापाऱ्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने एका व्यापाऱ्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.वर्धमाननगरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये राहणारे सुंदर कालिदास पटेल (वय ५३) यांचे स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यातून रविवारी सकाळी ७ आणि ७ वाजून ४ मिनिटांनी दोन वेळा व्यवहार करून अज्ञात आरोपीने डेबिट कार्डच्या माध्यमातून ४० हजार रुपये काढून घेतले. मोबाईलवर रक्कम काढल्याची माहिती पटेल यांना मेसेजद्वारे कळाली. त्यामुळे त्यांनी सोमवारी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक गेडाम यांनी फसवणुकीचे कलम ४२० तसेच आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत आरोपीने ही रक्कम गया (बिहार) येथील एटीएममधून दोनदा कार्ड स्वाईप करून २०-२० हजार रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. रविवार दिवस आणि सकाळची वेळ असल्याने बँकेत तातडीने तक्रार करता येणार नाही, हे जाणून आरोपीने ही बनवाबनवी केली. त्यामुळे आरोपी (सायबर ठग) आर्थिक गुन्हे करणारा सराईत असावा, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम