शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 12:16 IST

"मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही"

Winter Session Maharashtra ( Marathi News ) नागपूर : मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही. आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील, कित्येकांना कारागृहात टाकतील, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली. 

हिवाळी  अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.  मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली. या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलविले जाईल, असेही सांगितले. मात्र, हे करीत असताना मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत कुणीही विचार करीत नाही. पुरोगामी म्हणवणारे पक्षदेखील याबाबत चकार शब्द काढीत नाहीत.

आम्ही वारंवार मागणी करूनही सभागृहात या विषयावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला वेळ दिला नाही, असेही आझमी यावेळी बोलताना सांगितले. त्यांच्यासह समाजवादी पक्षाचे आमदार रइस शेखदेखील उपस्थित होते. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAbu Azmiअबू आझमी