कमल शर्मा नागपूरविधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात सरकारने दुपटीने वाढ केली आहे.हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात टप्प्याटप्प्याने कर्मचारी येतात. त्यांना मिळणाऱ्या भत्त्याबाबत ते नेहमीच नाराजी व्यक्त करीत होते. या संदर्भात त्यांनी २०१४ च्या अधिवेशनादरम्यान मंत्र्यांकडे तसेच शिबिर कार्यालयाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत अर्थखात्याने अधिसूचना जारी केली आहे. कर्मचाऱ्यांना सध्या २७५ ते ३७५ रुपये विशेष भत्ता मिळत होता. आता त्यात वाढ करून तो ५२५ ते ७२५ करण्यात आला आहे.नवीन दरानुसार ज्यांचे वेतन ४२०० पेक्षा कमी आहे त्यांना ५२५ तर ८९०० रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना ७२५ रुपये, ६६०० ते ८९९९ या दरम्यान वेतन असणाऱ्यांना ६५० रुपये, ४४०० ते ५३९९ रुपये वेतन असणाऱ्यांना ६२५ आणि ४२०० ते ४३०० वेतन असणाऱ्यांना ५७५ रुपये भत्ता मिळणार आहे.
हिवाळी अधिवेशनाचा भत्ता झाला दुप्पट
By admin | Updated: April 5, 2015 02:27 IST