शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात निनादला ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:03 IST

राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला.

ठळक मुद्देधनगर समाजाचा एल्गारमुख्यमंत्र्यांसाठी अडून बसले, पाच वाजता झाली भेट तरुणांचा मोठ्या संख्येत सहभाग

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. कागदाची तयार केलेली पिवळी टोपी, खांद्यावर पिवळा दुपट्टा व हाती पिवळा ध्वज घेऊन मोठ्या संख्येत मोर्चेकरी सहभागी झाले होते. यात युवकांची संख्या लक्ष वेधून घेणारी होती.यशवंत स्टेडियम येथून निघालेला धनगर बांधवांचा हा मोर्चा मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट चौकात पोलिसांनी अडविला. माजी आमदार हरिदास भदे व मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला संबोधित करताना भदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. उलट ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ या संस्थेकडून सर्वेक्षण केले. याला समाजाचा विरोध आहे. अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करूनच राहणार, असा निर्धारही त्यांनी आपल्या भाषाणातून केला. पोलिसांनी जेव्हा मोर्चाचे शिष्टमंडळांना निवेदन घेऊन सोबत चलण्यास सांगितले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोर्चात यावे या मागणीसाठी मार्चेकरी अडून बसले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करीत मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. या मोर्चाला आ. प्रकाश शेंडगे, आ. रामराव वळकुटे आदींनी भेटी दिल्या.

मागण्याअनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करासोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव द्याधनगरांचा मेंढपाळ चराईचा प्रश्न सोडवानोकरीतून बडतर्फ करण्याची कारवाई थांबवा

नेतृत्वमाजी आ. हरिदास भदे, रमेश पाटील

टॅग्स :Politicsराजकारण