शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 09:55 IST

‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांकडून गुलाबाचे फूल वाहतूक पोलीस म्हटले की हातात पावतीबुक घेऊन सिग्नल तोडला की खिशाला कैची लावणारी व्यक्ती अशीच वाहतूक पोलिसांची प्रतिमा वाहनचालकांच्या मनात असते. परंतु ही प्रतिमा मोडित काढत शहराच्या विविध चौकात वाहतूक पोलिसांनी नागरिकांना एक

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने नवीन विचारांचे, नवसंकल्पाचे स्वागत करण्यासाठीची उत्सुकता याहीवेळी दिसली. गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना  तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता. नवीन वर्षाच्या स्वागताला अधीर झालेल्या तरुणाईचे जत्थे फुटाळा चौपाटीवर रात्री ८ पासून पोहोचायला लागले होते. इकडे धरमपेठ, रविनगर, सदर परिसरातही अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. सक्करदरा, मेडिकल, रेशीमबाग, दिघोरी या भागातही नववर्षांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. अखेर घड्याळाने १२ चा गजर केला अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी एकच जल्लोष करीत नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. डीजेचा आवाज वाढला, पावले थिरकायला लागली आणि हॅप्पी न्यू इयरच्या सादेने अवघा आसमंत दणाणून गेला. आतषबाजीच्या नेत्रदीपक रोषणाईत शहरात जणू ऐन मध्यरात्री सूर्य उगवला होता. डीजेच्या दणदणाताट बोचऱ्या थंडीतही तरुणाईने लुंगी डान्सवर जोरदार फेर धरला.मॉल्समध्ये विक्रमी गर्दीशहरातील अनेक हॉटेल्स, मॉल्स,गार्डन रेस्टारंटनी नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पॅकेजेस जाहीर केले होते. इंटरनेटवर त्याचे जोरदार प्रमोशन झाल्याने अनेक ठिकाणचे बुकिंग हाऊसफुल्ल होते. रात्री उशिरापर्यंत येथे खरेदी व मौजमस्ती सुरू होती. या दिवशी खरेदीचा ग्राफ वाढणार हे स्पष्ट असल्याने अनेक मॉल्समध्ये नवनवीन व आकर्षक वस्तूंची मोठी रेंज उपलब्ध करण्यात आली होती. यात कपड्यांपासून घड्याळ, परफ्युम, मोबाईल फोनचा समावेश होता. शहरातील केक शॉपनी खास थर्टी फर्स्टसाठी विशेष आॅफर सुरू केली होती. नवीन वर्षाच्या स्वागताची संकल्पना केकवर साकारण्यात आली होती. शहरातील अनेक केक शॉपमध्ये मोठी गर्दी दिसत होर्ती. कुटुंबासह धार्मिक पर्यटननववर्षाचे स्वागत करताना डान्स, मस्ती, मद्य आणि फटाक्यांची आतषबाजी करणे असेच प्रकार घडतात या समजाला अनेकांनी फाटा दिला. खास थर्टी फर्स्टचे निमित्त साधून अनेकजण सहकुटुंब धार्मिक पर्यटनाला गेले. पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी, शेगाव, तिरुपती यासोबतच शहराजवळचे आदासा, आंभोरा पारडशिंगा याठिकाणी अनेकांनी पूजाअर्चा करून सरत्या वर्षाला निरोप दिला.

वेगाची हवेशी स्पर्धाशहरातील इटर्निटी मॉल, एम्प्रेस मॉल, पुनम चेंबर, बिग बाजार या परिसरातील रस्ते गजबजून गेले होते. महाल, गांधीबाग, इतवारा परिसरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. परंतु सीताबर्डी, धरमपेठ, सदर, बजाजनगर या परिसरात तरुणाईची धूम दिसून आली. वाहनांचा वेग हवेशी स्पर्धा करीत होता. नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रस्त्यावर ओसंडून वाहत होता. धावत्या वाहनांवर सेल्फीचा थरारही रस्त्यावर अनुभवायला मिळाला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तानंतरही तरुणाईचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊसनवीन वर्षाच्या स्वागताची सोशल मीडियावरही जय्यत तयारी झाली होती. घड्याळाने १२ चा गजर करताच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक आदी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडायला लागला. तरुणाईत तर शुभेच्छा देण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू होती. नवीन वर्षाची विविध छायाचित्रे असलेल्या संदेशांचा यामध्ये समावेश होता. काहींनी नववर्षाच्या स्वागताचा व्हिडीओ बनवून तो आपल्या मित्रांना-नातेवाईकांना पाठवला. शुभेच्छा संदेशांनी रात्रभर लोकांचे मोबाईल खणखणत होते. 

टॅग्स :New Year 2018नववर्ष २०१८