शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी करणाऱ्या रिनाला व्हायचेय डॉक्टर

By admin | Updated: June 14, 2017 01:11 IST

अंगी गुणवत्ता असूनही ती परिस्थितीमुळे नेहमी तडजोड करीत आली. तथापि, प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अखेर आपले स्वप्न साकार केलेच.

श्रमाच्या बळावर गाठले ७० टक्के गुण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंगी गुणवत्ता असूनही ती परिस्थितीमुळे नेहमी तडजोड करीत आली. तथापि, प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अखेर आपले स्वप्न साकार केलेच. प्रतिकूल परिस्थितीत शाळेने केलेल्या मदतीच्या हाताचे संधीचे सोने करीत सुरक्षा रक्षकाच्या मुलीने दहावीत ७० टक्के गुण मिळविले. रिना सावनलाल मलगाम त्या विद्यार्थिनीचे नाव. मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा, उंटखाना येथील ती विद्यार्थिनी आहे. मंगळवारी दहावीचा निकाल समोर येताच पास झालेल्या मुलांचा एक वेगळा थाट सर्वत्र दिसून आला. कोणी त्यांना पेढ्यांनी भरवीत होते, कोणी हारतुरे देऊन शुभेच्छा देत होते, कोणी त्याच्या नवनवीन मागण्या पूर्ण करीत होते तर कोणी त्याच्यासाठी काय करू, काय नको यासाठी झटत होते. पण रिनाला ७० टक्के गुण मिळवूनही तिचे कौतुक करणारे कोणीच नव्हते. नेहमीप्रमाणे ती आपल्या काकासोबत कामावर आली. रेशीमबाग येथील एका बंगल्याच्या बांधकामासाठी पहिल्या मजल्यावर विटा पोहोचवीत होती. ‘लोकमत’ने तिला गाठून शुभेच्छा देताच ती रडायलाच लागली. त्या आनंदाच्या भरात आपल्या वडिलांचा मोबाईलनंबरही विसरली. कसेतरी काकाकडून गावाला गेलेल्या आई-वडिलांना ही सुखद बातमी दिली. तिकडूनही रडण्याचा आवाज आला. उंटखाना येथील रमाई बुद्धविहाराच्या बाजूला एका बंद इमारतीच्या रखवालीची जबाबदारी रिनाच्या वडिलांवर आहे. याच इमारतीच्या परिसरात टिनाची झोपडी करून हे कुटुंब राहते. काही कामानिमित्त तिचे आई-वडील मंगळवारी गावाला गेले होते, तर ती काकासोबत मजुरीच्या कामावर आली होती. रिनाला बोलते केल्यावर ती म्हणाली, माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे. दहावीत गणित विषयाची भीती वाटत होती. परंतु शाळेतील शिक्षकांनी मदत केली. सध्या सुट्या असल्याने आईला मजुरीच्या कामात मदत करते, असे म्हणून भावुक झालेली रिना म्हणाली, खूप मेहनत घ्यायची इच्छा आहे सर, याच बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून आहे. घरची स्थिती पाहता हे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास आहे.