शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

निडोज बारमध्ये आढळला मद्यसाठा

By admin | Updated: July 2, 2017 02:24 IST

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार धंतोलीतील बहुचर्चित निडोज बार आणि रेस्टॉरेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभाग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार धंतोलीतील बहुचर्चित निडोज बार आणि रेस्टॉरेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभाग आणि पोलिसांनी छापा घातला. यावेळी येथे विनापरवाना आॅर्केस्ट्रा चालविला जात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, या आॅर्केस्ट्रात मुंबईसह बाहेरगावच्या तरुणी आढळून आल्या. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात उंची दारूचा साठाही सापडला. अधिकाऱ्यांनी तो जप्त करून बारमालक राजू ऊर्फ राजीव प्यारेलाल जयस्वाल (रा. बांते ले-आऊट, सोमलवाडा) याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्य महामार्गावरील ५०० मिटरवरील बार आणि मद्यालये बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच उपराजधानीतील अनेक बार आणि मद्यालये बंद झाली. त्यात मुंजे चौकातील निडोज बारचाही समावेश आहे. मात्र, बाहेरून हा बार बंद झाल्याचे दिसत असले तरी आतमध्ये मद्यसाठा ठेवून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे तसेच डान्स बारही चालविला जात असल्याची गुप्त तक्रार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळाली. हॉटेलमधील भूलभूलय्या निडोज बार आणि रेस्टॉरंट नवीन व्यक्तीसाठी एखाद्या भूलभूलय्यासारखेच असल्याचे कारवाई करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याही गल्लीतून गेल्यानंतर संबंधित नवीन व्यक्ती जुन्याच जागी परत येते. येथील काही रूममधल्या भिंतींवर चारही बाजूने काचा (आरसे) लावल्या आहेत. त्या काचेच्या भिंतींमध्येच एका काचेच्या भिंतीतील दाराला धक्का देऊन आतमध्ये जावे लागते, असे हा अधिकारी म्हणाला. मनोरंजन करही थकीत विशेष म्हणजे, निडोज बार आणि रेस्टॉरंटमधील आॅर्केस्ट्राला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतच परवानगी होती. त्यानंतर नूतनीकरण करून परवानगी न घेताच येथे आॅर्केस्ट्रा व गझलचे आयोजन सुरू होते. सूत्रानुसार, निडोज बारच्या संचालकाने आॅर्केस्ट्रा व गझलचे आयोजनासाठी मनोरंजन कर मार्च २०१७ पर्यंतच भरला होता. एप्रिल २०१७ नंतरचा मनोरंजन करही थकीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आॅर्केस्ट्रात काम करणाऱ्या चारही तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सांगितले.