शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापीठातून शिकविला जाणार का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाने उपस्थित केला आहे. हा धडा तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन दिला.

ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघाचा सवाल : आरएसएसचा अभ्यासक्रम रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापीठातून शिकविला जाणार का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाने उपस्थित केला आहे. हा धडा तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन दिला.डबरासे म्हणाले, आरएसएसने स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध केला होता. १९४२ च्या चले जाव आंदोलनाला त्यांनी विरोध केला होता. तसेच ५२ वर्षापर्यंत आरएसएसने देशाचा राष्ट्रध्वज कधीच फडकवला नाही. हा आरएसएसचा खरा इतिहास आहे. तेव्हा बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) पूर्ण एक धडा सामील करणे, पूर्णपणे अवैध आहे. देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाºयांचा इतिहास अभ्यासक्रमात आम्ही सामील होऊ देणार नाही, याबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल. विद्यापीठाने तातडीने हा धडा मागे न घेतल्यास भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी याविरुद्ध राज्यभरात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष रवी शेंडे, नीतेश जंगले, राजू जंगले, संदीप मेश्राम, राजेश रंगारी, अतुल शेंडे उपस्थित होते.निवडणुका बॅलेट पेपरनेच व्हाव्यातईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला. बहुतांश ठिकाणी झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी करण्यात आलेल्या मतदानात फरक आढळून आला आहे. तेव्हा यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरनेच घेण्यात याव्यात, अशी मागणीसुद्धा सागर डबरासे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघMediaमाध्यमे