शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:49 IST

बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा सवाल :काँग्रेस-भाजप सारखेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.रवी शेंडे म्हणाले,भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे त्याला हरवणे आवश्यक आहे. परंतु बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी लोक भाजपची भीती दाखवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. हे बरोबर नाही. त्यांना काँग्रेसचा प्रचार करायचाच असेल तर उघडपणे करावा, परंतु छुपा अजेंडा चालवू नये. काँग्रेसने ७० वर्षांपासून आपल्या समाजावर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात अन्याय केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येऊ नये म्हणून कॉँग्रेसनेच प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. दोनवेळा त्यांचा पराभव केला. इतकेच नव्हे तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना हिंदू स्मशान भूमीत जागा देण्यासाठी मज्जाव केला. हा इतिहास आम्ही विसरणार आहोत का? असा प्रश्नही शेंडे यांनी उपस्थित केला.संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यात घडले. भोतमांगे कुटुंबाला संपवण्यात आले. देशात जेव्हा कधी समाजावर जातीय हल्ले होतात, तेव्हा खैरलांजीचे उदाहरण दिले जाते. इतके अमानुष ते हत्याकांड होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून देशभरात आंदोलन झाले. आम्हीही त्यात सहभागी होतो. हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. हजारो तरुण तुरुंगात गेले. हजारोंनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. इतकेच नव्हे तर अनेक जण गोळीबरालाही सामोरे गेले. परंतु त्याच वेळी खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचे काम काही नेतेमंडळी करीत होते. अशा लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा अशा लोकांच्या पाठीमागे समाजाने कसे उभे राहावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.खैरलांजीचा लढा संपलेला नाहीखैरलांजी हत्याकांडातील आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी समाजाचा लढा आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तो संपलेला नाही, याची आठवणही रवी शेंडे यांनी यावेळी करून दिली.वंचित बहुजन आघाडी हाच पर्यायकाँग्रेस-भाजपा सारखेच आहे. बौद्ध आंबेडकरी समाजाचे एकूणच वंचित समाजाचे भले हे दोन्ही पक्ष करू शकत नाही. त्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे समाजाने या आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहनही रवी शेंडे यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019