शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:53 IST

२०१४ च्या लोकसभेत विदर्भाने ‘आप’वरच झाडू चालविल्याचा इतिहास डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सर्व ६२ जागांवर लढून आपल्यामागील ताप न वाढविता निवडक १५ जागांवर ‘फोकस’ केला जात आहे.

ठळक मुद्दे१५ जागांवर फोकस २०१४ च्या लोकसभेत कामगिरी सुमार

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीत दुबळ्या झालेल्या काँग्रेसचा फायदा आम आदमी पार्टीने घेत काँग्रेसवर झाडू चालविला होता. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विदर्भात काँग्रेसला घरघर लागली आहे. आता या परिस्थितीचा फायदा उचलत विदर्भात पाय रोवण्यासाठी ‘आप’च्या पोल मॅनेजर्सनी रणनीती आखली आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभेत विदर्भाने ‘आप’वरच झाडू चालविल्याचा इतिहास डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सर्व ६२ जागांवर लढून आपल्यामागील ताप न वाढविता निवडक १५ जागांवर ‘फोकस’ केला जात आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात ‘आप’ची कामगिरी सुमार राहिली. चंद्रपुरात माजी आमदार वामनराव चटप यांना वैयक्तिक ताकदीवर २ लाख ४ हजार ४१३ मते मिळाली. नागपुरात तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासारख्या चर्चेतील चेहरा समोर केला असतानाही दमानियांना ६९ हजारावर पोहचविण्यात कार्यकर्त्यांचीच दमछाक झाली. भंडारा-गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम व बुलढाणा या मतदारसंघात तर १० हजारही मते मिळविता आली नाही. चाचपणीतच निकाल कळाल्याने त्यानंतर झालेल्या २०१४ ची विधानसभा व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ‘आप’ दूरच राहिली.आता अचानक विधानसभेसाठी आठ उमेदवारांची घोषणा करीत ‘आप’ने एन्ट्री घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांची उमेदवारी जाहीर करून ‘आप’ने चर्चेतील ‘सोशल फेस’ दिला आहे. उर्वरित जागांवरही असेच तोडीचे उमेदवार देण्यासाठी पक्षाची चाचपणी सुरू आहे. ‘आप’च्या उमेदवारीसाठी पक्षाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाची पडताळणी करून पक्षाच्या आचारसंहितेत बसणाऱ्यांना मुंबईला मुलाखतीला बोलाविले जात आहे. पक्षाच्या नागपूर कार्यालयातदेखील अर्ज भरण्याची सोय करण्यातआली आहे.‘आप’ने महापालिकेच्या निवडणुकी वेळीच तयारी केली होती. पण काही कारणास्तव निवडणूक लढली नाही. विधानसभेसाठी विदर्भात नियोजन बैठका सुरू आहेत. किमान १५ जागा लढविल्या जातील. नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम, पश्चिम व मध्य नागपूर तर ग्रामीणमधील रामटेक अशा चार मतदार संघांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील तीन मतदार संघांसाठी सहा इच्छुकांनी तर रामटेकसाठी दोघांनी मुलाखती दिल्या आहेत.- देवेंद्र वानखेडे, सदस्य, राज्य प्रचार समिती, ‘आप’

चारित्र्यवानच ‘इनकमिंग’ स्वीकारणारसध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कालपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आज लगेच दुसºया पक्षात सामावून घेतले जात आहे. ‘आप’चाही प्रमुख पक्षातील बंडखोरांवर डोळा आहे. मात्र, संबंधितांना पक्षात प्रवेश देताना त्याचे चारित्र्य, शिक्षण, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का, आदी बाबी तपासूनच प्रवेश दिला जावा, असा ठरावच ‘आप’च्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या निकषांचे तंतोतंत पालन केले जाईल, असा दावाही ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :AAPआप