शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 23:44 IST

अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसंघाचा विजयादशमी उत्सव आज : ‘हायटेक’ राहणार सोहळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे उपस्थित राहणार आहेत.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाचा विजयादशमी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा संघाचे प्रयत्न आहेत. काही दिवसांतच महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. मे २०१९ मध्ये केंद्राला जनतेने परत पसंती दिली. अशास्थितीत केंद्राचे आर्थिक धोरण, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, सीमा क्षेत्रातील स्थिती, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.‘ ट्विटर ’, ‘फेसबुक’, ‘रेडिओ’वर ‘लाईव्ह’देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारची परत वापसी झाल्यानंतरचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव आहे. शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सोबतच प्रथमच ‘फेसबुक’सह, ट्विटर, यूट्यूब या माध्यमातूनदेखील संघाचा कार्यक्रम जगभरात ‘लाईव्ह’ होणार आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ