शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

शंभरीत तरी ‘प्लेसमेंट’ वाढणार का?

By admin | Updated: July 23, 2014 00:54 IST

गेल्या काही वर्षांपासून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ प्रचंड प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेवर विश्वास कायम होता. परंतु शंभरी गाठणाऱ्या

शासकीय तंत्रनिकेतन : ढिसाळ धोरणांमुळे विद्यार्थ्यांना फटकानागपूर : गेल्या काही वर्षांपासून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ प्रचंड प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेवर विश्वास कायम होता. परंतु शंभरी गाठणाऱ्या या संस्थेत गेल्या काही वर्षांपासून ‘कॅम्पस प्लेसमेंट’ घसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मध्य भारतातील नामांकित संस्थेत बोटावर मोजण्याइतपत कंपन्या ‘कॅम्पस’मुलाखती घेण्यासाठी येत आहेत. शंभरीचा उत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेत जास्तीत जास्त नामांकित कंपन्या याव्यात यासाठी प्रशासन पुढाकार कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.एक काळ होता की शासकीय तंत्रनिकेतन राज्यातील एक महत्त्वाची संस्था होती. आजदेखील संस्थेमध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मात्र पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. येथील विद्यार्थ्यांना रोजगार देण्यास कंपन्यादेखील उत्साहित असायच्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘कॅम्पस प्लेसमेंट’चा टक्का घसरणीस लागला आहे. ३ वर्ष अगोदर सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांची निरनिराळ्या कंपन्यांकडून निवड व्हायची. परंतु मागील सत्रात केवळ ७१ विद्यार्थ्यांना ‘प्लेसमेंट’ मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ८ ते १० कंपन्या येथे ‘इंटरव्ह्यू’ घेण्यासाठी आल्या होत्या.यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता पदविका घेतल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीकडे जातात. त्यामुळे ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये नोकरी मिळाल्यावर विद्यार्थी नकार कळवितात. यामुळे फारशा कंपन्या येण्यास उत्सुक नसतात, असे उत्तर विद्यापीठाचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी यांच्याकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या घसरत्या टक्क्याबाबत निरनिराळी कारणे देण्यात येत असली तरी ढिसाळ धोरणच याला कारणीभूत असल्याची माहिती संस्थेतीलच सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांवर खापर का?नागपुरातील शासकीय तंत्रशिक्षण संस्थेत सुमारे ८४० जागा आहेत. यातील काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीसाठी जातात हे खरे आहे. परंतु बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातून येत असल्याने त्यांना चांगल्या रोजगाराची अपेक्षा असते. संस्थेत शासकीय सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शिवाय ‘प्लेसमेंट सेल’देखील आहे. मागील वर्षी ८ ते १० कंपन्या ‘कॅम्पस’मुलाखती साठी आल्या होत्या. यात काही नामांकित कंपन्यांचा समावेश होता. परंतु मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांना ‘कॅम्पस’मुलाखतीसाठी संस्थेत आणण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. शिवाय येणाऱ्या कंपन्यातील काही अपवाद सोडले तर विद्यार्थ्यांना फारसे ‘पॅकेज’देखील देण्यात येत नाही. अशा स्थितीत मग विद्यार्थ्यांसमोर महाविद्यालयाबाहेर पडून नोकरी शोधण्याशिवाय पर्याय नसतो. ८०० पैकी केवळ ७१ विद्यार्थी म्हणजे ‘प्लेसमेंट’चा आकडा केवळ ९ टक्के इतका आहे. प्रशासनाचा दावा आहे की विद्यार्थी अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात. परंतु खरोखरच ९० टक्के विद्यार्थ्यांचा यात समावेश असतो का याचा प्रशासनानेच विचार करायला हवा, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.