शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय अखेर दिल्लीला जाणार ?

By admin | Updated: August 15, 2016 01:55 IST

आयआयएम, एम्ससारख्या संस्था नागपुरात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागपुरातील एक महत्त्वपूर्ण संस्था दिल्लीला हटविण्याचा घाट रचला गेला आहे.

नागपूरचे मुख्यालय हटविण्याला गुपचूप वेग : कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष नागपूर : आयआयएम, एम्ससारख्या संस्था नागपुरात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागपुरातील एक महत्त्वपूर्ण संस्था दिल्लीला हटविण्याचा घाट रचला गेला आहे. ५८ वर्षापूर्वी नागपुरातच स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय आता दिल्लीला हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गुपचूपपणे सुरू असलेल्या या हालचालींना मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र विरोध दर्शविला असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विविध शासकीय संस्था, संघटना, कंपन्या तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एका निश्चित कालावधीत प्रशिक्षण देण्यासाठी १९५८ साली केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली व मंडळाचे मुख्यालय नागपुरातच सुरू करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी सुरूकेले आंदोलन श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला स्थानांतरीत करण्याच्या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून काळ्या फिती लावून शांततेत आंदोलन केले. यानंतर येत्या १६ आॅगस्टपासून सर्व कर्मचारी दररोज मुख्यालयी धरणे आंदोलन करणार आहेत. हे मुख्यालय नागपुरातून हटवू नये, अशी मागणी अखिल भारतीय तृतीय व चतुर्थ श्रेणी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजेश देशमुख व महासचिव राजेश मिश्रा यांनी केली आहे.