शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

त्या नराधम आरोपीविरुद्ध नव्याने खटला चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 20:43 IST

आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा नराधम आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (४९) याच्याविरुद्ध आता सत्र न्यायालयामध्ये नव्याने खटला चालविला जाईल. हा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश दिलेत.

ठळक मुद्देअल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार : फाशी व इतर सर्व शिक्षा हायकोर्टात रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा नराधम आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (४९) याच्याविरुद्ध आता सत्र न्यायालयामध्ये नव्याने खटला चालविला जाईल. हा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश दिलेत.लांडगेविरुद्ध या दोन्ही प्रकरणांत वेगवेगळा खटला चालविण्यात आला होता. वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाने एका खटल्यात ५ आॅक्टोबर २०१७ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२)(आय) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. दुसऱ्या खटल्यामध्ये ११ जानेवारी २०१८ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३७६(ई) (अत्याचाराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या दोन्ही निर्णयांविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल करून सत्र न्यायालयामध्ये स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळाली नाही असा दावा केला. विधी सेवा विभागाकडून पुरेसा अनुभव नसलेला व असक्षम वकील बाजू मांडण्यासाठी देण्यात आला होता. त्यामुळे योग्य बचाव करता आला नाही असे त्याने सांगितले. प्रकरणावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांना आरोपीच्या दाव्यांत तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयाचे दोन्ही निर्णय रद्द केले व या दोन्ही प्रकरणांवर दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने खटला चालविण्यात यावा असा आदेश सत्र न्यायालयाला दिला. तसेच, यावेळी आरोपीची बाजू मांडण्यासाठी अनुभवी व सक्षम वकिलाची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिलेत. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. शंतनू भोयर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.अशी आहेत प्रकरणेआरोपी लांडगे आश्रमशाळा वसतिगृहाच्या नवनिर्मित इमारतीमध्ये चौकीदार होता. तो आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना स्वत:च्या वासनेची शिकार करीत होता. तसेच, तो विद्यार्थिनींना आरडाओरड केल्यास किंवा दुसऱ्याला अत्याचाराची माहिती सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे मुली गप्प राहात होत्या. दरम्यान, एका मुलीमुळे आरोपीच्या राक्षसी कृत्याला वाचा फुटली. त्यानंतर दुसरी मुलगीही धाडस दाखवून पुढे आली. दोन्ही घटना आॅगस्ट-२०१५ मधील आहेत. मुलींच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार