शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

-तर कलाक्षेत्रच इतिहासजमा होणार?

By admin | Updated: December 17, 2014 00:31 IST

महाराष्ट्राला लाभलेला कलेचा इतिहास मोठा वैभवशाली आहे. हे वैभव पुढे नेण्यासाठी राज्यात शासकीय चित्रकला महाविद्यालये उघडण्यात आली. दरवर्षी हजारो विद्यार्थी चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण करून

कलेप्रति शासन उदासीन : नव्या मंत्र्यांकडून मोठी अपेक्षाअविष्कार देशमुख - नागपूरमहाराष्ट्राला लाभलेला कलेचा इतिहास मोठा वैभवशाली आहे. हे वैभव पुढे नेण्यासाठी राज्यात शासकीय चित्रकला महाविद्यालये उघडण्यात आली. दरवर्षी हजारो विद्यार्थी चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण करून या वैभवात भर घालत असतात. मात्र अशा शिक्षकांची मायबाप राज्य शासनानेच थट्टा चालवली आहे. त्यामुळे कला क्षेत्रात कमालीची अस्वस्थता आहे. यंदा कला क्षेत्रात कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या अधिव्याख्यातांना ही शेवटची संधी शासनाने दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात कायमस्वरूपी अधिव्याख्याते पद भरण्यात येणार असल्याचे समजते. मात्र कायमस्वरुपी अधिव्याख्याता पदभरती संदर्भात कोणत्याच हालचाली अद्याप होत नसून यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण आहे. कायमस्वरूपी पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येते. परंतु शैक्षणिक वर्ष संपण्यास अल्पकाळ शिल्लक असल्याने तातडीने जाहिरात काढण्याची गरज असताना देखील कोणत्याच हालचाली शासनाकडून होताना दिसत नाही. कला क्षेत्रालाच इतिहासजमा करण्याचा हा डाव शासनाचा आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. राज्यात नव्याने आलेल्या सरकारने तरी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आपल्या तडकफडक निर्णयासाठी प्रसिध्द आहेत. मात्र त्यांनीही अद्याप याबाबत पुढाकार घेतलेला नाही. राज्यात जवळपास मंजूर पदांपैकी ८०% अधिव्याख्यातांची पदे रिक्त आहेत. चारही शासकीय महाविद्यालये मिळून मंजूर पदे जवळपास ११५ आहेत. त्यापैकी स्थायी स्वरूपाचे जवळपास २७ अधिव्याख्याते कार्यरत आहेत, तर १५ हंगामी आहेत. त्यामुळे राज्यात अंदाजे ८८ पदे रिक्त आहेत. शिवाय ४६ कंत्राटी अधिव्याख्याते पुनर्नियुक्तीचे जे पत्र मागील वर्षी प्राप्त झाले आहे ते शेवटचे नियुक्ती पत्र असल्याचे पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नियुक्तीचे पत्र मिळणार नाही. आकडेवारीनुसार, ४२ अधिव्याखाते राज्यातील कला क्षेत्राचा गाडा पुढे नेत आहेत. यासंदर्भात नुकतेच नागपूर येथे कला शाखेच्या एका शिष्टमंडळाने या विषयावर राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असता त्यांनीही फक्त आश्वासनापलिकडे काहीच दिलेले नाही.कलासंचालकही नाहीराज्यातील कलेचे वैभव सातासमुद्रापलीकडे घेऊन जाणाऱ्या कला क्षेत्राला कला संचालक नाही. हे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यातील शासकीय चित्रकला महाविद्यालय कलासंचालनालयाच्या अखत्यारित येते. या चारही महाविद्यालयाला कलासंचालक नसल्याने कलासंचालनालय सध्या रामभरोसे आहे. विशेष म्हणजे कलासंचालक हा कलेशी निगडित असावा अशीदेखील मागणी कलाक्षेत्रातून नेहमी होत आली आहे.