शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी भुकेने व्याकुळ

By admin | Updated: April 14, 2017 02:59 IST

तुटपुंज्या मजुरीत वाढ करून देण्याच्या मागणीसह महाराजबागेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारल्याने येथील

महाराजबागेतील कर्मचारी संपावर : प्राणिसंग्रहालयात ३०० प्राणी नागपूर : तुटपुंज्या मजुरीत वाढ करून देण्याच्या मागणीसह महाराजबागेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारल्याने येथील वन्यप्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. माहिती सूत्रानुसार येथे एकूण २० कर्मचारी कार्यरत असून, यात १६ कंत्राटी तर ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना केवळ ९० रुपये मजुरी दिल्या जाते. जेव्हा की वन विभागातील वनमजुरांना ३०० रुपये मजुरी मिळते. त्यामुळे वनमजुरांप्रमाणे आम्हालाही किमान ३०० रुपये मजुरी द्या, या मागणीसह गुरुवारी महाराजबागेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाने महाराजबाग प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. विशेष म्हणजे, येथील सर्व वन्यप्राण्यांच्या देखभालीची जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर असून, ते प्रत्येक वन्यप्राण्यांना खाद्य देण्यासह त्यांच्या पिंजऱ्यांची साफसफाई करणे, पाणी पाजणे, परिसराची स्वच्छता करणे आणि उन्हापासून बचावासाठी पिंजऱ्यात लावण्यात आलेल्या कूलरमध्ये पाणी भरणे, अशी विविध कामे केली जातात. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सर्व कामे ठप्प झाली असून, दिवसभर सर्व प्राणी भूक व तहानेने व्याकुळ झाले होते, शिवाय सर्व कूलर बंद पडले होते. सध्या महाराजबागेत सुमारे ३०० वन्यप्राणी आणि पक्षी असून, यात ३ वाघांसह ८ बिबट, २ मगर, १२ नीलगाय, १ अस्वल, २० काळवीट, २० चितळ, २ चौसिंगा, २ पाणमांजर व ६ माकड आहेत. या संपाविषयी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिस्थिती गंभीर झाली असल्याचे सांगितले, शिवाय याची आपण वरिष्ठांना माहिती दिली आहे. सध्या महाराजबाग कार्यालयात दोनच कर्मचारी कामावर असून, त्यांच्या मदतीने प्राण्यांची शक्य तेवढी देखभाल ठेवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)७१ मंजूर पदांपैकी ६९ रिक्त महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या देखभालीसाठी एकूण ७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु सध्या त्यापैकी केवळ दोनच पदे भरली असून, इतर ६९ पदे रिक्त आहेत. येथील मंजूर पदांमध्ये क्युरेटर, डॉक्टर, झू कीपर, हेड अ‍ॅनिमल कीपर, चपराशी, कम्पाऊंडर, शिपाई व लिपिक अशा विविध पदांचा समवेश आहे. परंतु सध्या यापैकी एकही पद भरलेले नाही. अशा स्थितीत प्राणिसंग्रहालय कसे चालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.