शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून, पतीस जन्मठेप

By admin | Updated: October 1, 2015 03:11 IST

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर झोपडपट्टीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला पहिले तदर्थ न्यायालयाचे .....

न्यायालय : एमआयडीसी भागातील प्रकरणनागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर झोपडपट्टीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने बुधवारी जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अब्दुल सईद शेख ऊर्फ अब्दुल शाहीद अब्दुल वहीद शेख (५१) असे आरोपीचे नाव असून, तो पंचशीलनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे. रमिझा, असे मृत महिलेचे नाव होते. ती अब्दुल सईदची पत्नी होती. खुनाची ही घटना ३ मे २०१४ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी अशी, रमिझा ही नेहमी रात्रीच्या वेळी आपला मुलगा साहिल याला सोबत घेऊन बहिणीकडे झोपायला जायची. घटनेच्या दिवशी रमिझासोबतच या प्रकरणातील फिर्यादी हलिमा, रेखाबाई आणि आरती ह्या वेगवेगळ्या खाटांवर झोपलेल्या होत्या. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास आरोपी अब्दुल सईद हा तेथे गेला होता आणि पत्नीला घरी चलण्यास म्हणाला होता. रमिझाने सोबत येण्यास नकार देऊन सईदला घरी जाऊन झोपण्यास सांगितले होते. आरोपी सईद हा आपल्या घरी परत गेला होता आणि रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन पत्नीकडे परत आला होता. त्याने रमिझाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले होते. ती जागीच ठार झाली होती. अन्य लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता सईद याने त्यांना धमकी दिली होती. हलिमा शकील सय्यदच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सईदला कुऱ्हाडीसह अटक केली होती. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये सायकल विकण्यावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग धरून त्याने हा खून केला होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद पिंपळगावकर तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. भुरे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल पप्पू यादव, फाळके, नायक शिपाई किशोर ठाकरे आणि दिलीप यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)