शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्व सुखापासून वंचिंत महिलेने संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: July 27, 2016 02:45 IST

लग्नाला पाच वर्षे होऊनही मातृत्व सुख लाभले नसल्याने निराश झालेल्या एका महिलेने आत्महत्या केली.

नागपूर : लग्नाला पाच वर्षे होऊनही मातृत्व सुख लाभले नसल्याने निराश झालेल्या एका महिलेने आत्महत्या केली. ओमकारनगर अजनीतील रेणुका अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. पिंकी अखिलेश पंचेश्वर (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंकीचे पती अखिलेश हे पिंपळा गावाजवळ बांधकामस्थळी काम करतात. सोमवारी सकाळी कामावर गेल्यानंतर नेहमीप्रमाणे दुपारी २ वाजता ते जेवण करायला घरी आले. आतून दार बंद असल्याने त्यांनी पत्नीला आवाज दिला. मात्र, बराच वेळ होऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखिलेशने घरमालकाला आवाज दिला. दोघांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पिंकी जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडून दिसली. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून अखिलेशने तिला मेडिकलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी पिंकीला तपासून मृत घोषित केले. पिंकीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, लग्नाला पाच वर्षे होऊनही पिंकीला मुलबाळ झाले नाही. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. मातृसुखापासून वंचित असल्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात असून तिच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)