शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतीला वाईट म्हणणारी पत्नीच ठरली क्रूर

By admin | Updated: June 27, 2016 02:54 IST

विविध खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाह संबंध

राकेश घानोडे ल्ल नागपूरविविध खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाह संबंध पुनर्स्थापित करण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयात कायम राहू शकला नाही. उच्च न्यायालयाने पतीच्या विनंतीवरून हा वादग्रस्त निर्णय रद्द केला.प्रकरणातील राहुल व कविता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी २० आॅगस्ट २००२ रोजी लग्न केले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. राहुलचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालाय तर, कविताच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. राहुलला पहिल्या पत्नीपासून दोन मुले तर, कविताला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. राहुलचा पहिल्या पत्नीसोबत १३ वर्षांनंतर घटस्फोट झाला होता. राहुल व कविताचे लग्नाच्या काही महिन्यानंतरच खटके उडायला लागले. संबंध विकोपाला गेल्यानंतर राहुल कविताला सोडून वेगळा राहायला लागला. राहुलला वेगळे होऊन तीन वर्षे झाल्यानंतर कविताने विवाह संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ही याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध राहुलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. कविताने कुटुंब न्यायालयातील याचिकेत राहुलवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यावरून राहुल फारच वाईट स्वभावाचा व विकृत मनोवृत्तीचा माणूस असल्याचे प्रतित होत होते. असे असतानाही कविता त्याच्यासोबत राहण्यास इच्छुक आहे ही बाब उच्च न्यायालयाला पटली नाही. उच्च न्यायालयाने कविताचे सर्व आरोप बिनबुडाचे ठरविले. राहुल एवढा वाईट असता तर त्याच्यासोबत राहण्याची कविताची इच्छाच नसती असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. राहुलने कविताच्या क्रूरतेसंदर्भात पुरावे सादर केले होते परिणामी न्यायालयाने राहुलचे अपील मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्वाळा दिला.असे होते पतीवरील आरोपपतीने केवळ मालमत्तेसाठी माझ्यासोबत लग्न केले. प्रत्येक चार वर्षाने नवीन लग्न करण्याचा आपला व्यवसाय आहे असे पती सांगत होता. पती माझ्या मुलींचा मानसिक छळ करीत होता. तो मुलींची हत्या करण्याची धमकी देत होता. मला व मुलींना उपाशी ठेवत होता. पतीने सिलेंडरचे रेग्युलेटर काढून ठेवले होते इत्यादी गंभीर आरोप पत्नीने केले होते.