शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने स्वत: सोडले पतीला, पोटगीचा अधिकार गमावला; हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 24, 2025 10:35 IST

प्रकरणातील पत्नी अकोला तर, पती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी. २५ डिसेंबर २०१५ रोजी झाले होते लग्न.

राकेश घानोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पतीची कोणतीही चूक वा इतर ठोस कारण नसताना स्वत:च्या मर्जीने वेगळी झालेली आणि पतीने सोबत नांदण्याकरिता बोलावल्यानंतरही परत जाण्यास नकार देणारी पत्नी पोटगी मिळण्यासाठी पात्र नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात दिला.

प्रकरणातील पत्नी अकोला तर, पती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर पत्नी केवळ दहा महिने पतीसोबत राहून माहेरी निघून गेली. तिने पोटगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पतीवर विविध आरोप केले होते. लग्न जोडताना पती महाविद्यालयात व्याख्याता आहे. त्याला भरपूर वेतन मिळते. तो शिकवणी वर्गही चालवितो. त्याच्याकडे स्वत:चे घर व शेती आहे, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, ही माहिती खोटी होती. 

पतीवरील आरोप खोटे

पती विनाअनुदानित महाविद्यालयात कार्यरत असून, त्याला केवळ नऊ हजार रुपये मासिक वेतन मिळते. तो केवळ एकाच खोलीत राहतो, असे सिद्ध झाले. पती व सासरची मंडळी वाईट वागणूकही देतात, असे पत्नीचे म्हणणे होते. परंतु, ती एकही आरोप सिद्ध करू शकली नाही.

पतीचा नकार नव्हता

पतीने पत्नीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले किंवा नकार दिला, याबाबत कोणतेही ठोस पुरावे न्यायालयाला रेकॉर्डवर आढळून आले नाही. उलट, पतीने पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, हे रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय