शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीपाठोपाठ पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: June 21, 2017 02:17 IST

पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नी मुलासोबत मोटरसायकलने जायला निघाली असता खाली कोसळली.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेवाडा : पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नी मुलासोबत मोटरसायकलने जायला निघाली असता खाली कोसळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पतीपाठोपाठ तिनेही जगाचा अखेरचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे भिवापूर तालुक्यातील टाका या गावात मंगळवारी शोककळा पसरली होती. माधव गोमाजी खोब्रागडे (४५) व पंचशीला माधव खोब्रागडे (४२) रा. टाका, ता. भिवापूर अशी या दुर्दैवी पती -पत्नीची नावे आहेत. खोब्रागडे कुटुंबीय कामाच्या शोधात नागपूरला गेले होते. माधवला कारखान्यात काम मिळाल्याने ते मुलगा सम्यक व मुलगी संबोधी यांच्यासोबत नागपूरलाच किरायाने घर घेऊन राहू लागले. आई, वडील व भाऊ टाका येथे राहात असल्याने माधव घराच्या दुरुस्तीसाठी रविवारी (दि. १८) दुपारी टाका येथे आले होते. सोमवारी (दि. १९) दुपारी माधवची प्रकृती अचानक बिघडली आणि सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनाची बातमी कळताच पंचशीला यांना धक्काच बसला. त्या सोमवारी सायंकाळी मुलगा सम्यक व मुलगी संबोधीसोबत मोटरसायकलने टाका येथे यायला निघाल्या. नागपूरहून टाका येथे येत असताना उमरेड-भिसी मार्गावरील गरडापार परिसरात मोटरसायकल उसळली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.